Sanjay Raut Post : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण आणि नंतर हत्या झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. राज्यभरातून या घटनेचा निषेध नोंदवला जात असून संतापाची लाट पाहायला मिळत आहे. दरम्यान या घटनेला २०हून अधिक दिवस उलटले आहेत, मात्र अद्यापही या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचे सांगितले जात आहे. तसेच लवकरात लवकर वाल्मिक कराड याला अटक करावी यासाठी आंदोलने केली जात आहेत. यादरम्यान शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो पोस्ट केला आहे. याबरोबरच त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार राऊत यांनी वाल्मिक कराड याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा कथित फोटो पोस्ट केला आहे. “व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा आका?”, असं कॅप्शन या फोटोला दिले आहे. या पोस्टमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टॅग केले आहे.

संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या फोटोवर काही मजकूर लिहिलेला आहे. ज्यामध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर फोटोत असणारा खंडणीखोर, खुनी, गावगुंड (वाल्मिक कराड) पोलिसांना सापडत नाही. एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी किती पारदर्शक होईल. हाय का नाही मोठा जोक?”. तसंच या फोटोला त्यांनी क्या सीन है?? नक्की कोण कुणाचा आका? असं कॅप्शन दिलं आहे.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अटकेची मागणी होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यावरही टीका केली जात आहे. हे वाल्मिक कराड याला अटक होत नसल्याच्या मुद्द्यावरून विरोधक त्यांला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत आहेत. याप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा>> सुशासन निर्देशांक २०२३ जाहीर केला जाणार नाही, केंद्र सरकारचा निर्णय; नेमकं कारण काय?…

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर अपहरण करून हत्या करण्यात आली होती. अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेल्या या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय, निकटवर्तीय व मित्र परिवाराने त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, ते कुठेच आढळून आले नाहीत. त्यानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा मुद्दा चर्चेत आला आहे.