Sanjay Raut on Anil Deshmukh Attack : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली. दरम्यान, या प्रकरणी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काटोल मतदार संघात अनिल देशमुख यांचे पूत्र सलील हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखरेच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी संजय राऊत म्हणाले, “अनिल देशमुखांवर निर्घृण हल्ला झाला. त्यांच्या डोक्यावर दगडफेकीच्या जखमा झाल्या आहेत. ते रक्तबंबाळ आणि अत्यवस्थ होते. हा हल्ला करताना भाजपाच्या नावाने जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.”

MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”
loksatta readers response
लोकमानस : आज भेदाभेद-भ्रमसुद्धा मंगल!
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : “एक दिवस तुमच्या सुसंस्कृतपणाचा पाढा…”, भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना थेट इशारा

हेही वाचा >> Anil Deshmukh Attack : अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “काही प्रवृत्तींना…”

कार्यकर्त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होईल

“राज्यात बाबा सिद्दिकींची हत्या होते. गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न होतो. या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे निघालेले हे धिंडवडे आहेत. निवडणूक काळात राज्याच्या प्रशासनाची सुत्रे निवडणूक आयोगाकडे असतात. भाजपाच्या काळात त्यांचीच माणसं असतात, देवेंद्र फडणवीसांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, उद्या मतदान होणार आहे, आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कितीतरी कार्यकर्त्यांना धमक्या येतील, त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रयत्न होतील. हे प्रकार राज्यभरात सुरू झाले आहेत”, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

“अनिल देशमुखांचे चिरंजीव उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत. अनिल देशमुख ७ वेळा निवडून आले आहेत. भाजपाची जे नौटंकी चालू आहे, असं कधी झालं नव्हतं. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावेत असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं, ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या काळात झालं आहे. काय यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे?” असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला.

Story img Loader