रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात बारसू या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी अधिकारी सर्वेक्षणासाठी येणार असल्याचं कळताच स्थानिकांनी या सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला. अबालवृद्धांसह महिलांनीही येथे तळ ठोकून या प्रकल्पाला विरोध दर्शवला. याप्रकरणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करायला सुरुवात केल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. बारसू येथे रिफायनरी प्रकल्प राबवण्याकरता उद्धव ठाकरेंनी जागा सुचवली होती, असं उदय सामंत काल म्हणाले. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नाणार आणि बारसू या दोन्ही जागांसंदर्भातील शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट होत्या. नाणारला विरोध होता, लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्याने केंद्राला बारसू ही पर्यायी जागा होऊ शकते, असं त्यांनी सुचवलं. पण लोकांचा विरोध असेल तर शिवेसना त्याला पाठिंबा देणार नाही. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पर्यायी जागा सुचवली. आता जर लोक विरोध करण्यासाठी पुढे आले असतील, मरू पण जागा देणार नाहीत, अशी त्यांची भूमिका असेल तर त्या पत्राला आमच्या लेखी किंमत शुन्य. तो एक शासकीय कागद आहे. शिवसेना लोकभावनेच्या बाजूने आहे. स्थानिक भूमिपूत्र तुरुंगात जायला तयार आहे, मरायला तयार आहेत, लाठ्या काठ्या खायला तयार आहे. उदय सामंत यांनी शहाणपणा करू नये. जागेवर जावं आणि लोकांशी बोलावं”, असं संजय राऊत म्हणाले.

“उद्योग आला तर रोजगार वाढेल ही आमची भूमिका कायम आहे. परंतु, एअरबस, फॉक्सफॉनसारखे प्रकल्प बाहेर का गेले, ते कोकणात होते का? हवा तेज में चल रही है, टोपी उड सकती है”, असा इशाराही राऊतांनी यावेळी दिला.

हेही वाचा >> “रिफायनरीसाठी बारसूची जागा उद्धव ठाकरेंनीच सुचवली”, थेट पत्र सादर करत उदय सामंतांचा दावा

“सुपाऱ्या घेऊन बोलू नका”, असाही इशारा संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना दिला. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवेसनेला सुपारी घेण्याची गरज पडली नाही. इलेक्शन कमिशनपासून न्यायव्यवस्थेपर्यंत सुपाऱ्या घेऊन कोण काम करतंय? आतापर्यंत आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत संयमाने विधाने केली आहेत. कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली आहे. त्या कागदावर वाळवी लागली असले साताऱ्यात. लोकं आमच्यासोबत आहेत. बारसूला स्थानिक भूमिपूत्रांना हा विषारी जहरी प्रकल्प नको असेल तर आणि त्यासाठी ते मरायला तयार असतील तर शिवेसना त्यांना मरू देणार नाही. पहिली गोळी शिवसेनेच्या छातीवर जाईल”, असं संजय राऊत म्हणाले.

“फॉक्सकॉन वेदांत घेऊन या ना, नाही विरोध करणार. कोकणात हा पहिला प्रकल्प आहे का? अलिबागमध्ये हजारो एकर जागेवर भूमिपूजन झालंय. रायगडमध्येही अनेक प्रकल्प आहेत. कोणी विरोध केला? चिपळूणला लोटे एमआयडीसी चालू आहे. कोणी विरोध केला? विरोध झाले फक्त स्टरलाईट कंपनीला. त्यानंतर, युतीच्या काळात एका एनर्जी प्रकल्पाला विरोध झाला होता. मुंडे म्हणाले होते तो प्रकल्प अरबी समुद्रात बुडवू. आणि आता रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाला. कोकणातील मंत्री केंद्रात आहेत. त्यांनी कोकणात कोणते प्रकल्प आणले, कधी आणले? आणले ते विषारी प्रकल्प. स्टरलाईट कंपनीला गाषा गुंडाळून पळावं लागलं होतं, हा इतिहास फडणीसांना माहित नसेल तर त्यांनी आमची शिकवणी लावावी”, असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut reaction on barsu refinery project in konkan also targeted to uday samant over uddhav thackeray letter sgk
Show comments