महाराष्ट्रातील महाविकास आघाडी म्हणजे ‘औरंगजेब फॅन क्लब‘ आहे आणि या औरंगजेब फॅन क्लबचे नेते हे उद्धव ठाकरे आहेत, अशी बोचरी टीका अमित शाह यांनी पुण्यातील भाजपाच्या मेळाव्यात बोलताना केली होती. त्यांच्या या टीकेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आता अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

औरंगजेब फॅन्स क्लबचे सदस्य असं म्हणत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही त्यांच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही. आम्ही पाकिस्तानात जिनांच्या कबरीवर जाऊन कधी फुलं उधळली नाहीत किंवा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केकही खाल्ला नाही. मुळात देशातील राष्ट्रवादी मुस्लीमांची बाजू मांडणं यात काहीही चुकीचं नाही. या देशाच्या संघर्षाच्या काळात मुस्लिमांनीही योगदान दिलं आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

मुळात लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात येऊन अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मात्र, तरीही महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा दारुण पराभव केला. त्याचा हा आक्रोश आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राज्याच्या राजकारणातील सन्मानीय व्यक्ती आहेत. आम्ही भाजपाप्रमाणे खोट्याच्या मशीन लाऊन काम करत नाही. आम्ही ईव्हीएम, निवडणूक रोखे आणि ईडी-सीबीआयचे घोटाळे करून निवडणूक जिंकत नाही. आम्हाला जनतेने स्वच्छ आणि स्पष्ट मार्गाने विजयी केलं आहे, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनाही केलं लक्ष्य

पुढे बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केलं. कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस कशाप्रकारची भाषा वापरली, हे सर्वांनी बघितलं आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा, असं फडणवीस म्हणाले. ही कुठली भाषा आहे? राज्याचे गृहमंत्री एका गुंडासारखी भाषा वापरता, हे दुर्दैवी आहे, आज राज्याची कायदा सुव्यस्था बिघडली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. चोरीच्या घटना घडत आहे, असं असताना राज्याचा गृहमंत्री ठोकशाहीची भाषा करतो? फडणवीसांनी आधी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि मग ठोकशाहीची भाषा करावी. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल, असं संजय राऊत म्हणाले.

Story img Loader