Sanjay Raut : काँग्रेसचे खासदार, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यामुळे भाजपाने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राहुल गांधी आरक्षण विरोधी आहेत असं भाजपाकडून सांगितलं जातं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी एक गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट रचला जातो आहे असं संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?

राहुल गांधींवर हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं जातं आहे. दोन ते तीन दिवसांपासून काही गोष्टी समोर येत आहेत. उत्तर प्रदेशचे एक मंत्री असोत किंवा महायुतीचे आमदार राहुल गांधींबाबत अशीच भाषा करत आहेत. राहुल गांधीची तुलना कुणी नंबर एकचे दहशतवादी अशी केली आहे तर कुणी त्यांची जीभ छाटण्याची भाषा करतं आहे. रशियात जे घडलं, ते आता इथे आपल्या देशात घडताना दिसतं आहे. विरोधकांना संपवण्याची भाषा आपल्या देशात होते आहे असं संजय राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

विरोधी पक्षनेत्यांना संपवण्याचं षडयंत्र

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचं षडयंत्र रचल जात असल्याचं संजय राऊत म्हणाले. काहीजण राहुल गांधींची अवस्था त्यांचे वडील आणि आजी यांच्यासारखी होईल असं म्हणत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री यावर शांत बसत असतील तर ही एक रणनीती आहे. गृहमंत्रीही त्या कटाचा भाग असू शकतात. असा आरोप संजय राऊतांनी केला. सगळ्यात आधी मी ही गोष्ट समोर आणली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात एक मोठी रणनीती आखली जात आहे, त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचार काहीजण करत आहेत असं राऊत (Sanjay Raut ) म्हणाले.

हे पण वाचा- Sanjay Raut on PM Modi: लाडकी बहीण योजनेवर मोदींची टीका, संजय राऊतांचा हल्लाबोल

मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवलं आहे

आम्हाला केंद्र सरकार आणि भाजपची चीड तसेच तडफड समजून घेतली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन संविधान संपवले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसंच आता चंद्रचूड जेव्हा निवृत्त होतील तेव्हा याबाबत भाष्य करतील. आधीही या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार बसलं आहे. अशीही टीका संजय राऊत यांनी केली. आम्हाला तारखांवर तारखा देऊन गुंतवलं गेलं आहे. एका घटनाबाह्य सरकारला सरन्यायाधीशांनी अभय दिलं असल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे आज काय होतं याकडं आमचं अजिबात लक्ष नाही. आम्हाला न्याय मिळणार नाही असेही राऊत (Sanjay Raut ) म्हणाले

महाविकास आघाडीचं जागावाटप लवकरच

आज आमची महाविकास आघाडीची बैठक आहे. या बैठकीला इतर लहान पक्ष देखील येणार आहेत. तिन्ही पक्षाचे नेतेही येणार आहेत. काँग्रेस नेते व्यस्त आहेत. पण त्यांना आम्ही बैठकीला आलं पाहिजे, असं सांगितलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय. आमची जागावाटपाची चर्चा व्यवस्थित सुरु आहे. त्यातून योग्य तो मार्ग निघेल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader