उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ते मागील साधारण ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करत आहेत. तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचा उल्लेख करत आहेत. असे असताना तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय राऊत पुन्हा एकदा सकाळच्या पत्रकार परिषदा घेणार का? ते पुन्हा एकदा पत्रकारांशी संवाद साधत सत्ताधाऱ्यांना घेरणार का? असा प्रश्न विचारला जातोय. याच प्रश्नाचे राऊत यांनी उत्तर दिले आहे. लिहिणाऱ्या आणि बोळणाऱ्या लोकांनाच तुरुंगात टाकले जाते. मी टिळक आणि वीर सावरकर यांच्याशी तुलना करणारच, असे राऊत म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’ने आयोजित आलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते.
“मी तुलना करणारच,” टिळक, वीर सावरकरांचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले…
उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-11-2022 at 18:56 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut said will compare with lokmanya tilak and veer savarkar criticizes opposition prd