सांगली : सांगलीत ठाकरे शिवसेनेचे चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. आ. डॉ.विश्वजीत कदम आणि विशाल पाटील आमचेच असल्याने त्यांची नाराजी लवकरच दूर होईल असे ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी सांगलीत सांगितले.
सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस व उबाठा शिवसेना यांच्यात अद्याप चुरस कायम आहे या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीसाठी खा. राऊत आज सकाळी सांगलीत आले आहेत. सांगलीत येताच त्यांनी माध्यमाशी संवाद साधला.
हेही वाचा…मोठी बातमी! कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा येणार बाहेर, लोकसभेला मतदान करणार?
ते म्हणाले, सांगलीची जागा शिवसेनाचं लढणार आहे. विशाल पाटील आणि पतंगराव कदम यांच्या विषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे. विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेणार. दोन महिन्यानंतर सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील. राणे यांच्या ईडी व सीबीआयच्या बंद फाईल आमची सत्ता आल्यावर उघडणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.