Sanjay Raut on Devendra Fadnavis : “राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसांच्या जागी दुसऱ्या कोणाला आणलं जातंय का?” असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. राऊत म्हणाले, “केवळ एका गृहमंत्रीपदावरून महायुतीचा सरकार स्थापनेचा मुद्दा अडलेला असू शकत नाहीत. काहीतरी वेगळं कारण दिसतंय. इतकं मोठं बहुमत मिळाल्यावर गृहमंत्रीपद हा वादाचा विषय असू शकत नाही”. दरम्यान, “उद्यापर्यंत याचा उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी महायुतीला इशारा दिला आहे. “बहुमत असूनही राज्याला सरकार दिलं जात नाही ही शरमेची बाब आहे”, असं म्हणत राऊत यांनी महायुतीवर टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “फक्त एक गृहमंत्रीपद हा वादाचा विषय असू शकत नाही, तो सारकार स्थापनेमधला अडथळा असू शकत नाही. अनेक राज्यात भारतीय जनता पार्टीने सरकारं बनवलेली आहेत. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे कोण हा प्रश्न लोकांना पडला आहे. गृहमंत्री पदाऐवजी काहीतरी वेगळा विषय आहे का? असा प्रश्न लोकांना पडला आहे. फडणवीसांच्या जागी वेगळ्या कुठल्या नेत्याला आणलं जातंय का? त्यासाठीच सत्तास्थापनेचा कारभार थांबलाय का? उद्यापर्यंत या गोष्टींचा उलगडा व्हायला पाहिजे. अन्यथा आम्ही आमचं बंद असलेलं पुस्तक उघडू.
हे ही वाचा >> अविनाश जाधवांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला? बाळा नांदगावकरांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले…
महायुतीने बहुमत मिळूनही राज्याला सरकार दिलेलं नाही ही शरमेची बाब : संजय राऊत
शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभा सदस्य संजय राऊत म्हणाले, “एका गृहमंत्रीपदावरून या महाराष्ट्र राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. हे कसले मजबूत लोक? तुमच्यासमोर कोण आहे? तुम्हाला सरकार स्थापनेपासून कोण अडवतंय? तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, मग सरकार स्थापन करा. तुमच्याकडे बहुमताची संख्या आहे. तसेच तुमच्याबरोबर अजित पवार आहेत. त्यांच्याकडे ४१ आमदार आहेत. शिंदे गटाचे लोक तुमच्याबरोबर आहेत की नाही ते मला माहिती नाही. ते भविष्यात काय करतील ते सांगता येत नाही. बहुमत असतानाही तुम्ही १० दिवस झाले तरी शपथ घेतली नाही. राज्याला सरकार दिलं नाही ही शरमेची बाब आहे.
…तर आमचं सरकार पडलं नसतं : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, जेव्हा-जेव्हा आम्ही पूर्वी चर्चा करायचो, तेव्हा तेव्हा ते आम्हाला सांगायचे की उद्धव ठाकरे यांनी गृह खातं दुसऱ्या पक्षाला देण्याची चूक करू नये. आमचंही तेच म्हणणं होतं. गृह खातं, विधानसभेचं अध्यक्षपद हे त्यावेळी संवेदनशील विषय होते. त्यामुळेच आमचं सरकार पडलं. अन्यथा आमचं सरकार पडलं नसतं.