तुरुंगात कैद असलेल्या काही मोठ्या गुन्हेगारांना आगामी निवडणुकांच्या आधी बाहेर काढण्याचं षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले, मुख्यमंत्री कार्यालय तुरुंगात असलेल्या अनेक मोठ्या गुन्हेगारांच्या संपर्कात आहे. यात ३०२ कलमाअंतर्गत कैद असलेल्या कैद्यांपासून अनेक मोठमोठ्या आरोपींचा समावेश आहे. मुंबईपासून नाशिक, कोल्हापूरपर्यंत राज्यातल्या वेगवेगळ्या तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांशी संपर्क साधला जात आहे.

संजय राऊत म्हणाले, तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांबरोबर मुख्यमंत्री कार्यालय वाटाघाटी करत आहे. सत्तेत सहभागी असलेले लोक त्यांच्या संपर्कात आहेत. तुरुंगात कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यात आले असून त्यावरून संपर्क साधला जात आहे. हे सगळं मुख्यमंत्री कार्यालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. लवकरच याबाबतची माहिती मी लोकांसमोर घेऊन येईन. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्याकडे लक्ष देण्यापेक्षा या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावं. ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत. परंतु ते त्यांचं फ्रस्ट्रेशन (निराशा) महाराष्ट्रावर काढत आहेत. यामुळे केवळ राज्याचं नुकसान होणार आहे. राज्यातलं सरकार दाऊद इब्राहिमच्या टोळीसारखं काम करत आहे.

Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”

हे ही वाचा >> “…त्या कलंकित लोकांनी फडणवीसांवर बोलणं हास्यास्पद”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “अडचणीच्या काळात…”

खासदार संजय राऊत म्हणाले, काही गुन्हेगारांना निवडणुकीपूर्वी तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून या कैद्यांशी वाटाघाटी सुरू आहेत. मी लवकरच याचे पुरावे देईन. अनेक मोठ्या गुन्हेगारांबरोबर या वाटाघाटी सुरू आहेत. निवडणुकीआधी काही कैद्यांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढण्याचं षडयंत्र रचलं आहे. हे षडयंत्र कोणाविरोधात आहे, याची माहिती आणि पुरावे मी लवकरच तुमच्यासमोर मांडेन.

Story img Loader