मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या (शिंदे गट) १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधीच्या कार्यवाहीची जबाबदारी विधानसभेच्या अध्यक्षांवर सोपवली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर याप्रकरणी सुनावणी घेणार आहेत. दरम्यान, येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित आमदार अपात्र ठरतील आणि मुख्यमंत्री पदावर इतर नेत्याची वर्णी लागेल, असा दावा विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे. विरोधी पक्षांच्या या दाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (२७ ऑक्टोबर) उत्तर दिलं. एकनाथ शिंदे अपात्र झाले तरीही तेच मुख्यमंत्री राहतील, असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस म्हणाले, शिंदे अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं जाईल आणि तेच पुढे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, ही खूप गंभीर गोष्ट आहे. फडणवीसांना माहिती आहे की शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना खात्री आहे की शिंदे आता अपात्र ठरणार आहेत. तरी अपात्र ठरल्यावर आम्ही त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचं पद टिकवू असं फडणवीस म्हणतायत. म्हणजेच, तुमच्याकडे एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद टिकवायला तोडगा आहे. परंतु, मराठा आरक्षणावर तोडगा नाही. मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे. तुमच्याकडे त्यांच्यासाठी तोडगा नाही. शिंदे आणि त्यांच्या टोळीला वाचवायला तोडगा आहे. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मात्र तुम्हाला सोडवता येत नाही.

हे ही वाचा >> “देवेंद्र फडणवीसांचा इतिहास कच्चा, छत्री उगवावी तसं…”, ‘त्या’ आरोपाला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतरही विधान परिषदेवर आमदार होतील. परंतु, त्या ४० आमदारांचं काय? त्या प्रत्येकाला तुम्ही विधान परिषदेवर घेऊन घटनाबाह्य पद्धतीने राज्य करणार आहात का? देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य धिक्कार करण्यासारखं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी अपात्र ठरल्यानंतही तुम्ही त्यांना विधान परिषदेवर घेणार आणि मंत्रीपद टिकवणार, याचा अर्थ तुम्ही कायदा, संविधान आणि नितीमत्ता मानायला तयार नाही. भाजपा नितीमत्तेच्या बाबतीत खाली घसरली आहे. भाजपावाले सर्वोच्च न्यायालयाचंही ऐकायला तयार नाहीत. ही कसली मस्ती आहे? याला माज म्हणतात. देशातली जनता तुमचा हा माज २०२४ साली उतरवेल. तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालून राज्य करणार आहात का?