Sanjay Raut vs Eknath Shinde Mahayuti New Government : “एकनाथ शिंदे हे आजारी असून त्यांच्या प्रकृतीविषयी कोणीही वेडंवाकडं बोलू नका” अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना बजावलं आहे. राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे यांची प्रकृती नाजूक आहे. आपण सर्वांनी काल (शनिवार, ३० नोव्हेंबर) वृत्तवाहिन्यांवर पाहिलं की त्यांच्या हाताला पट्ट्या लावल्या होत्या. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले तर ते त्या मंत्र्यांना देखील भेटले नाहीत. ते ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीला येतील की नाही याबाबत देखील शंका आहे. कदाचित त्यांना एअर ॲम्ब्युलन्समधून आणावं लागेल की काय अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे”.
संजय राऊत म्हणाले, “काल आपण प्रसारमाध्यमांवर पाहिलं, एकनाथ शिंदे हाताला पट्ट्या लावून बसले होते. त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले. परंतु, शिंदे आपल्या मंत्र्यांना देखील भेटले नाहीत. त्यांची तब्येत फारच खराब आहे असं दिसतंय. प्रकृती नाजूक असलेल्या माणसाला कोणीही त्रास देऊ नका. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी आहे, अशी घोषणा भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. या शपथविधीला शिंदे येतात की नाही याबाबत शंका आहे. त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे आणावं लागू शकतं”.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
ठाकरेंच्या शिवसेनेचा एकनाथ शिंदेंना चिमटा
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यासाठी डॉक्टर तिकडे गेले होते असं मी वर्तमानपत्रात वाचलं. परंतु, त्यांना डॉक्टरांची गरज आहे की मांत्रिकाची? हा मांत्रिक अमित शाह पाठवणार की नरेंद्र मोदी? मांत्रिक त्यांना बरं करायला जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या अंगात भूत संचारलं आहे. ही भूतं बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाची गरज लागेल. बहुदा देवेंद्र फडणवीस ती संचारलेली भूतं बाहेर काढतील. फडणवीसांनी शिंदेंची भूतं बाहेर काढली तर आनंदाची गोष्ट आहे”.
हे ही वाचा >> “माजी सरन्यायाधीश चंदचुडांनी देशात आग लावली”, महाराष्ट्र व संभलचं उदाहरण देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप
एकनाथ शिंदे अमावस्येच्या दिवशी त्यांच्या गावी जातात अशी टीका ठाकरे गटाकडून सातत्याने केली जात आहे. काल, आमदार आदित्य ठाकरे व संजय राऊत यांनी अमावस्येच्या दिवशी गावी जाण्यावरून शिंदेंना चिमटा काढला होता. आज राऊत म्हणाले, शिंदेंना बरं करण्यासाठी, त्यांच्या अंगात संचारलेली भूतं बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाची गरज आहे.