राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २,३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी रविवारी (५ ऑक्टोबर) मतदान पार पडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. आशाताई पवार म्हणाल्या, माझं वय आता ८६ वर्षे इतकं आहे, त्यामुळे माझ्या हयातीत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं.

आशाताई पवार यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले, प्रत्येक आईची अशी इच्छा असते. परंतु, अजित पवार आजपर्यंत जे काही बनले, ते शरद पवारांमुळेच. अजित पवारांच्या आईची ही इच्छा आहे. मी त्यांना नमस्कार करतो. आपला मुलगा पंतप्रधान व्हावा, आपला मुलगा मुख्यमंत्री व्हावा, आपला मुलगा राष्ट्रपती व्हावा, अशी इच्छा प्रत्येक आईची असते.

What Sharad Pawar Said?
Sharad Pawar : शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत,”महायुतीने ज्या योजना आणल्या त्याचा त्यांना फायदा होईल, पण…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar Dhananjay Munde
Sharad Pawar : “सत्ता फार लवकर डोक्यात गेली”, शरद पवारांचा धनंजय मुंडेंना टोला; म्हणाले, “अडचणींच्या काळात…”
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

संजय राऊत म्हणाले, अजित पवार आज जे काही आहेत, ते त्यांना शरद पवारांनीच बनवलं आहे. शरद पवारांनी त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं. आता मुख्यमंत्री होण्यासाठी ते अमित शाहांकडे गेले असतील तर अमित शाह अजित पवारांना मुख्यमंत्री करतील.

हे ही वाचा >> “ऐन दिवाळीत शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी आणलं”, कांदा प्रश्नावरून राष्ट्रवादीचा मोदी सरकारला टोला

आशाताई पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर वेगवेगळ्या राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कुठल्या आईला तसं वाटणार नाही?” तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवार म्हणाले, “अजितदादांच्या स्वप्नांसाठी त्यांच्या आईने प्रार्थना केली असेल तर ती स्वाभाविक आहे. आई म्हणून त्यांची प्रार्थना अजित पवारांच्या स्वप्नांना भरारी देणारी ठरो. अजित पवारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन झालं तर त्यांचं स्वप्न नक्की पूर्ण होऊ शकेल.”