राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात २,३५३ ग्रामपंचायतींमधील २० हजारांपेक्षा अधिक जागांसाठी रविवारी (५ ऑक्टोबर) मतदान पार पडलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतल्या काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर अजित पवारांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केली. आशाताई पवार म्हणाल्या, माझं वय आता ८६ वर्षे इतकं आहे, त्यामुळे माझ्या हयातीत माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावं, असं मला वाटतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in