महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेवरून तिढा निर्माण झाला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत होती. दरम्यान, हा तिढा सुटला असून ही जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे. महाविकास आघाडीतले प्रमुख नेते आणि शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून युतीत ही जागा काँग्रेस लढवत आली आहे. परंतु, यंदा राष्ट्रवादीने या जागेवर दावा केला आणि जागावाटपात भिवंडीची जागा आपल्याकडे घेतली आहे. मविआच्या या निर्णयावर स्थानिक काँग्रेस नेत्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच चालू असल्याचं बोललं जात होतं. अशातच बुधवारी (३ एप्रिल) मुंबई महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवर खलबतं झाल्याची चर्चा होती. याबाबत खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, आमची जागावाटपावरील चर्चा खूप आधीच पूर्ण झाली आहे. आता आम्ही जागावाटप सोडून इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटत आहोत, बैठका घेत आहोत.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”

संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मला वाटत नाही की अजून कुठल्या जागेवर मविआत चर्चा चालू असावी. काल आम्ही नक्कीच भेटलो. शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, मी आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी भेटलो. आम्ही मविआच्या एका महत्त्वाच्या बैठकीत बराच वेळ चर्चा केली. परंतु, प्रत्येक बैठकीत जागावाटपावरच चर्चा होते असं सांगणं चुकीचं आहे. जागावाटपावरील आमच्यातील चर्चा आता संपली आहे. तुम्ही (प्रसारमाध्यमं) जे दावे करत आहात, तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत त्यात तथ्य नाही. आमच्या कालच्या बैठकीत सांगली आणि भिवंडीच्या जागेवर बिलकूल चर्चा झाली नाही.

हे ही वाचा >> दोपहर का सामना, शिवसेना, काँग्रेस नी आता शिंदेंची शिवसेना? कसा आहे संजय निरुपम यांचा राजकीय प्रवास?

खासदार संजय राऊत म्हणाले, भिवंडी लोकसभेबाबतचा निर्णय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला घ्यायचा होता. माझ्या माहितीप्रमाणे भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हा पक्ष लढणार आहे. तुम्ही सांगलीबाबत विचारत असाल तर शिवसेना (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभेसाठी आमचा उमेदवारच जाहीर केला आहे.