इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ५० दिवसांपासून युद्ध चालू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या युद्धाबाबत केलेल्या एक्स पोस्टवरून इस्रायलने शुक्रवारी संताप व्यक्त केला. इस्रायली दुतावासाने यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालय आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी संजय राऊतांच्या एक्स पोस्टचा कडक शब्दांत निषेध नोंदवला. त्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

संजय राऊत यांनी इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे गाझातील परिस्थिती विषद करणारी एक बातमी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केली होती. या पोस्टवर कमेंट करताना त्यांनी “हिटलर ज्यूंचा इतका तिरस्कार का करत होता, हे आता समजतंय का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांच्या या एक्स पोस्टवरून मोठा गदारोळ झाला. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. परंतु, ही पोस्ट इस्रायलच्या दुतावासांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून राऊत त्यांची तक्रारदेखील केली आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Anil Deshmukh Book On Devendra Fadnavis
Anil Deshmukh : फडणवीसांनी काय ऑफर दिली होती? पार्थ पवार, आदित्य ठाकरेंना कसं अडकवायचं होतं? अनिल देशमुखांचे पुस्तकातून धक्कादायक खुलासे
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
worli assembly constituency Milind deora might be contest against aaditya thackeray
Worli Assembly Constituency: वरळीत शिंदे गटाकडून खासदार मिलिंद देवरा निवडणुकीत उतरणार? संजय राऊत म्हणाले, “थेट जय शाहांनाच…”
Sanjay Raut on Amit Thackeray Mahim Vidhan Sabha Constituency
Sanjay Raut on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत यांचे सूचक विधान; म्हणाले, “तो आमच्या…”
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा
Amit Shah On Terrorist Attack:
Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू, अमित शाह यांनी दिला मोठा इशारा; म्हणाले, “कठोर प्रत्युत्तर…”

खासदार संजय राऊत म्हणाले, त्यांना पत्र लिहू द्या. इस्रायल हा वर्षानुवर्षे भारताचा मित्र राहिला आहे. मी इस्रायलच्या भावनांचा आदर करतो. मी माझ्या पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? ज्या पद्धतीने गाझातल्या रुग्णालयांवर सातत्याने बॉम्ब फेकले जात आहेत. मोठे स्फोट घडवून आणले जात आहे. त्यामुळे तिथले लोक, रुग्ण मारले जात आहे. रुग्णालयामधील नवजात शिशूंना दूध मिळत नाहीये, पाणी मिळत नाहीये, हे सगळं चुकीचं आहे. युद्धाचे काही नियम असतात. महाभारताच्या काळापासून, त्याही आधीपासून युद्धाचे नियम बनलेत, आपण त्या नियमांचं पालन करत आलो आहोत.

खासदार राऊत म्हणाले, गाझा पट्टीत लहान मुलं, मुली त्यांच्या माता, आजी असे सगळेच निरपराध लोक मारले जात आहेत. त्यांना मदत मिळायला हवी. त्यांना मारू नये, हीच आपली मानवता आहे. युद्धाचे नियम पाळले जायला हवेत. याबद्दल मी माझी टिप्पणी केली. त्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यात मी काय करू शकतो. जगभरात ज्यू राहतात, भारतातही आहेत. भारतात आपण त्यांना वर्षानुवर्षे प्रेम दिलं.

हे ही वाचा >> “हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना ‘जनाब’ म्हटलं गेलं तेव्हा विश्वप्रवक्ते…”, शिंदे गटाचा संजय राऊत यांना सवाल

संजय राऊत म्हणाले, भारताची इस्रायलबाबत जी भूमिका आहे, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंपासून जी भारताची भूमिका राहिली आहे तीच आमची आणि देशाची भूमिका आहे. युद्ध सुरू झालं तेव्हा आपले पंतप्रधान इस्रायलबरोबर उभे राहिले. नंतर त्यांनी भूमिका बदलली. आता त्यांची वेगळी भूमिका आहे. परंतु, आम्ही कधी आमची भूमिका बदलली नाही. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आपल्या देशाची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे.