महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बुधवारी (२२ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्कवर मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जंगी सभा झाली. या सभेत राज यांनी शिवसेना (ठाकरे गट), उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर सडकून टीका केली. दरम्यान, राज यांची सभा स्क्रिप्टेड होती असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना सांगितलं की, “विधीमंडळाबाहेरची उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातली भेट स्क्रिप्टेड होती असा आरोप मनसेने केला आहे”. त्यावर राऊत म्हणाले की, “जसं की, त्यांच्या (मनसेच्या) नेत्यांचं परवाचं भाषण स्क्रिप्टेड होतं. मी सर्वत्र तेच ऐकतोय आणि वाचतोय.”
राऊत म्हणाले की, राजकारणात शिवसेनेला स्क्रिप्टेड काही करण्याची गरज नाही. आम्हाला बाहेरून सलीम-जावेद लागत नाहीत (संदर्भ : सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने अनेक सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांच्या पटकथा म्हणजेच स्क्रिप्ट लिहिल्या आहेत.) आम्ही समर्थ आहोत. आम्ही स्वतंत्र बुद्धीने काम करतो, विचार करतो. आमचा पक्षा स्वतःच्या पायावर उभा आहे. दुसऱ्यांची डोकी आम्हाला कामासाठी लागत नाहीत.
हे ही वाचा >> “…तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन”, उदयनराजे भोसलेंचं चॅलेंज
“तो तुमचा काय होणार?” : नांदगावकर
मनसेच्या मेळाव्यात मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर म्हणाले होते की, “राज ठाकरेंनी संजय राऊतांना मोठं केलं, पण तो त्यांचाही नाही झाला, तो तुमचा काय होणार. या संजय राऊतांनी स्वतः कबुली दिलेली की, मी शरद पवार यांचा माणूस आहे. आता त्यांनी स्वतःल पवारसाहेबांचा माणूस म्हटलंय म्हणजे पुढे काय होणार ते तुम्हाला माहितीच आहे.”