राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून (२७ जून) सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी वर्ष २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. तर आज अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनात महायुती सरकार मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे आमदार, नेते राज्य सरकारला विविध मुद्यांवरून घेरण्याच्या तयारीत आहेत. पुणे पोर्श अपघात प्रकरण, ‘महानंद’ची विक्री, राज्यातील बेरोजगारी, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक जाहीर होणार असल्याने हे पावसाळी अधिवेशन महत्वाचं आहे. अशातच विधान भवनात घडलेल्या एका घटनेची राज्यभर चर्चा होऊ लागली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे हे विधीमंडळ अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी सभागृहाकडे जाताना एकाच लिप्टमधून प्रवास केला. या काही मिनिटांच्या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत कालपासून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
ajit pawar free cylinder news
प्रत्येक वर्षाला तीन सिलिंडर मोफत; अर्थसंकल्पात अजित पवारांकडून ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ची घोषणा!
Anil parab and chandrakant patil
“कलिना सर्वांत वाईट कॅम्पस”, अनिल परबांचा विधान परिषदेत थेट दावा; मुलींच्या वसतिगृहाच्या प्रश्नावरून सभागृहात खडाजंगी!
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
What Ajit pawar Said?
Maharashtra Assembly Budget 2024-2025: अजित पवारांनी केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, कोण ठरणार पात्र? किती मिळणार निधी?
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

या भेटीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर हस्तांदोलन केलं. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला की दोन्ही नोत्यांमध्ये हस्तांदोलन झालं, आता दोन पक्षांमध्ये हातमिळवणी होईल का? आगामी विधानसभा निवडणुकीत काही नव्या गोष्टी पाहायला मिळतील का? यावर संजय राऊत म्हणाले, आम्ही कधीच भाजपाबरोबर हातमिळवणी करणार नाही.

हे ही वाचा >> “…अन् मी कपाळावर हात मारला”, अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा

संजय राऊत म्हणाले, अनेकदा दिल्लीत आम्ही संसदेत असतो तेव्हा सभागृहाकडे जाणाऱ्या लिफ्टमध्ये आमच्याबरोबर वेगवेगळे नेते असतात. बऱ्याचदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आमच्याबरोबर लिफ्टमध्ये असतात. मुळात तिथली व्यवस्थाच तशी आहे. तुम्हाला एकत्रच ये-जा करावी लागते. कारण सगळ्यांना एकाच सभागृहाकडे जायचं असतं. त्यामुळे लिफ्टमध्ये किंवा इतर ठिकाणी एकमेकांच्या समोर आल्यावर हस्तांदोलन करणे, नमस्कार करणे हा शिष्टाचार असतो. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांना नमस्कार केला असेल तर त्याची आज राजकीय चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्या भेटीचे वेगळे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीत पुन्हा भाजपाबरोबर हात मिळवणार नाही. आम्ही आमचे हात अपवित्र करून घेणार नाही.