उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत १२,००० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी (२१ जून) याप्रकरणी ठाकरे गटाशी संबंधित १५ ठिकणांवर छापेमारी केली आहे. त्याला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. भाजपा आणि शिंदे गटातील भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे असून मी ते ईडीला दिले आहेत. काल नाकाने कांदे सोलणारे फडणवीस या नेत्यांवर कारवाई करतील का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश सहकारी कारख्यान्यात पराभव का झाला? भ्रष्टाचारामुळेच त्यांचा परभाव झाला. तुमच्या भाजपाच्या लोकांनीच त्यांचा पराभव केला आहे. राधा कृष्ण विखे पाटील यांच्या संस्थानात झाकीर नाईक ४.५ कोटी रुपये का देतो. फडणवीसांची हिंमत आहे का याबद्दल चौकशी करण्याची. अन्यथा गृहमंत्र्यालयाने ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का पाठवतो. याच झाकीर नाईकवर केंद्र सरकारने टेरर फंडिंगचा आरोप केला आहे. ते साडेचार कोटी झाकीर नाईकने का पाठवले, ते पैसे कसे आले, त्या पैशाचे काय व्यवहार झाले होते. त्यासंबंधी काय हालचाली होत्या.
संजय राऊत म्हणाले, गृहमंत्री असूनही फडणवीसांकडे याबद्दलची माहिती नसेल तर ती आम्ही देतो. आमदार राहुल कुल यांच्या ५०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाचे पुरावे माझ्याकडे आहेत. यासंदर्भात काल आणि परवा ईडीकडे माहिती पोहोचली आहे. राहुल कुल हे भाजपाचे दौंडचे आमदार आहे. फडणवीसांचे एकदमक खास. यावर काय करतायत फडणवीस.
हे ही वाचा >> “मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…
संजय राऊत म्हणाले, दादा भुसे यांच्या १२८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची माहिती मिळाली आहे. याचे पुरावे ईडीकडे पोहोचले आहेत. उद्या अब्दुल सत्तारांच्या ७५० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचे कागद ईडीकडे जातील.