राज्यकर्ते ज्या पद्धतीने काम करत आहे, ही हुकूमशाही आणि दहशतवादाच्या पुढील पायरी आहे. पुतिन हा हुकूमशाह आहे. पुतिनने वॅग्नर हे भाडोत्री सैन्य नेमलं होतं. जेव्हा भाडोत्री सैन्यावर राज्य करण्याची वेळ येते, तेव्हा ते उलटले जाते. महाराष्ट्रात भाडोत्री सैन्यच राज्य करत आहे. हे भाडोत्री सैन्यच तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.

“वॅग्नर लष्कराप्रमाणे शिंदेंचं भाडोत्री सैन्य भाजपावर उलटणार आहे. हे कोणाचे नसतात. हे बाजारबुणगे आहेत,” अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे गटावर केली आहे. ते पाटणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “मी म्हणजे मालक हे दिल्लीत चाललं नाही, तर…”, संजय राऊतांचं पाटणमधून शंभूराज देसाईंवर टीकास्र

स्वार्थासाठी पाटण्यात लोक एकत्र आली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. यावर विचारल्यावर संजय राऊत म्हणाले, “हे परमार्थासाठी एकत्र आलेत का? हा त्यांचा अध्यात्म आणि परमार्थ असेल, तर सांगा. परमार्थाची व्याख्या वारकऱ्यांकडून समजून घ्यावी लागेल.”

प्रकाश आंबेडकरांनी औरंगाजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतलं. त्यावर शिवसेना स्टाईलने प्रतिक्रिया दिली नाही, असं विचारल्यावर संजय राऊतांनी सांगितलं की, “प्रकाश आंबेडकरांशी आमची युती झाली नाही. आम्ही यावर बोललो आहे. पण, फडणवीस यावर बोलू शकले नाहीत. अन्य लोक कबरीवर गेल्यावर फडणवीसांनी किती मोठा फणा काढला होता. आता हा फणा वेटोळे घालून बसला आहे का?”

हेही वाचा : “फडणवीसांकडे उद्धव ठाकरेंचा सर्व ‘कच्चाचिट्ठा’, केवळ बाळासाहेब…”, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हेच फडणवीस आणि शिंदे औरंगाजेबाची कबर उखडून टाकू म्हणाले होते. आम्ही जेसीबी घेऊन देतो, उखडून टाका,” असे आव्हानही संजय राऊतांनी फडणवीस आणि शिंदेंना दिलं आहे.