नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर या ठिकाणी १३ मे रोजी इतर धर्मीय लोकांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. या वादावरुन आरोप आणि प्रत्यारोप सुरुच आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांपासून आहे याचे पुरावे संजय राऊत देतील का? असा प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. काही वेळापूर्वीच तुषार भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषेदत त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

संजय राऊत यांना मंदिर समितीवर विश्वास नाही का?

संजय राऊत यांना मंदिर समितीवर विश्वास नाही का? असाही प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. जे लोक उरुसमध्ये सहभागी झाले होते त्यातले कोण कोण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत याची माहिती माझ्याकडे आली आहे. मात्र ती माहिती मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीला देणार आहे. या प्रकरणाला जे वेगळं वळण देण्याचा प्रयत्न झाला की सलोखा आहे, सौहार्द आहे, १०० वर्षांची परंपरा आहे त्या उद्धव ठाकरेंच्या संजय राऊत यांना माझा प्रश्न आहे की आयएसआयच्या एजंटला लाजवेल इतकं घाणेरडं कृत्य संजय राऊत यांनी केलं आहे. हिंदू धर्माच्या विरोधातल्या लोकांना बळ देण्याचं काम केलं आहे. संजय राऊत जिहाद्यांचे एजंट आहेत का? असाही प्रश्न तुषार भोसलेंनी विचारला आहे. संजय राऊत यांचा स्वतःच्या धर्मातल्या लोकांवर विश्वास नाही, मंदिर समितीवर विश्वास नाही असंही भोसले यांनी म्हटलं आहे.

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Israeli troops 100 hamas militant arrested
इस्रायलकडून हमासच्या १०० दहशतवाद्यांना अटक
israel, airstrikes across iran
विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
bajrang punia and vinesh phogat movement against brij bhushan singh seemed selfish says sakshi malik
बजरंग, विनेशची चळवळ स्वार्थी वाटली : साक्षी मलिक
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
Muslim or Halba candidate Embarrassment for Congress in nagpur
काँग्रेससमोर पेच; मुस्लीम की हलबा उमेदवार?

हळूहळू मंदिरात शिरायचं, परंपरा दाखवायची, व्हिडीओ रेकॉर्ड करुन पुरावे तयार करुन ठेवायचे. आजपासून ३०-४० वर्षांनी दावा करायचा की या मंदिरामध्ये आमची जागा आहे. आमचे पूर्वज धूप दाखवत आले आहेत. हेच आत्तापर्यंत हिंदू समाजाने सहन केलं आहे. आता हिंदू समाज रिस्क घेणार नाही. त्यामुळे माननीय गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांचे जे पुरावे आहेत ते मी एसआयटीकडे देणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर समितीने एसआयटीला हे सांगितलं आहे की आमच्या मंदिरात धूप दाखवण्याची अशी कुठलीही परंपरा नाही.

मी आज आपल्या माध्यमातून संजय राऊत यांना आव्हान देतो की १०० वर्षांपासून ही परंपरा सुरु आहे याचे पुरावे द्यावेत अन्यथा संजय राऊत यांनी हिंदू धर्म सोडला आहे असंच आम्ही समजू. त्र्यंबकेश्वर गावातल्या लोकांनीही स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे की आमच्या गावात अशी कुठलीही धूप दाखवण्याची परंपरा नाही. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी हे दाखवून दिलं की स्वार्थी राजकारणासाठी ते इतके लाचार झाले की स्वतःच्या धर्माशी त्यांनी गद्दारी केली. जगातले सर्वात मोठे गद्दार कोण असतील तर ते संजय राऊत आहेत असाही आरोप तुषार भोसले यांनी केला आहे.