Sanjay Raut Slam Ajit Pawar Over Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना यासह इतर मोठ्या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महसूली तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्यासमोर दारूच्या दुकानांचे परवाने वाढवण्यासंबंधी प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये देण्यासाठी सरकार त्यांच्या भाऊ, नवरा यांना दारूडे करण्याची योजना आखत असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत यांनी राज्याचे उत्पादन वाढावे यासाठी मद्य विक्री दुकानांचे परवाने वाढवण्याच्या मुद्द्यावरून अर्थमंत्री अजित पवार आणि राज्यातील महायुती सरकारला धारेवर धरले आहे. राऊत म्हणाले की, “लाडक्या बहीणींना दीड हजार देण्यासाठी लाडक्या बहि‍णींचा भाऊ आणि नवरा यांना दारुडे करणार आहेत. १५०० रूपयांसाठी संपूर्ण महाराष्ट्र दारूडा करण्याची यांची योजना असेल तर हे अत्यंत गंभीर आहेत. मी ऐकलं की दारूची दुकाने वाढवणार, ‘ड्राय डे’ कमी करणार…त्यानंतर दुकाने आणि मॉलमधून दारू विक्री करण्यासंदर्भात प्रस्ताव आला आहे. काहीही करून लाडक्या बहि‍णींना १५०० देण्यासाठी घरा घरात दारू पोहचवा असं ध्येय दिसतंय. म्हणजे बहि‍णींना १५०० द्यायचे आणि त्या बदल्यात बहि‍णींच्या घरात बेवडे-दारूडे निर्माण करायचे अशी पैसे कमवण्याची योजना दिसतेय.”

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, “ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारी आहे. अजित पवारांसारखा नेता महसूल वाढवण्यासाठी याबाबत विचार करत असेल तर ते राज्याचे दुर्दैव म्हणावं लागेल. जर ते (अजित पवार) खरोखर असा विचार करत असतील तर त्यांनी यशवंतराव चव्हाण… हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात … आणि त्यांच्या होर्डिंग्जवर शाहू-फुले-आंबेडकरांचे फोटो लावतात ते बंद केलं पाहिजे”, असेही संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा>> Right To Privacy : नागरिकांच्या गोपनीयतेला ‘सर्वोच्च’ स्थान, आरोपींचा मोबाइल किंवा लॅपटॉप डेटा तपासण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी

हा अतिशय गंभीर मुद्दा

राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना बंदही केली जाऊ शकते असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, “भविष्यात ते ही (लाडकी बहीण) योजना बंदही करू शकतात. लाखो हजारो कोटींचं ओझं घेऊन राज्य चालवणं सोपं नाही. निवडणुकींच्या आधी कोणतेही निकष न लावता मतांसाठी पैसे वाटले आणि निवडणुका जिंकल्यानंतर तुम्ही निकष लावताय. लाडक्या बहीणींना पंधराशे रुपये देण्यासाठी दारू दुकानाचे परवाने वाढवणे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे. बहि‍णींनी आपल्या घरात १५०० रुपयात आपण कोणते विष आणतोय याचे चिंतन केले पाहिजे. सरकार चांगल्या मनाने पैसे देत नाहीये”, असेही संजय राऊत म्हणाले.