अभिनेता प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा गल्ला जमवला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत वाद सुरू झाला आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिपुरुष चित्रपटाशी संबंधित दोन फोटो शेअर केले होते, तसेच या चित्रपटाचं त्यांनी प्रमोशनही केलं होतं. परंतु आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर वाद निर्माण झाल्यामुळे देवेंद्र फडणवीसांवरही टीका सुरू झाली आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत या वादावर बोलत असताना त्यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

खासदार संजय राऊत म्हणाले, मागे एक चित्रपट आला होता, त्यातल्या अभिनेत्रीने भगवी बिकनी घातली होती, तेव्हा या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हिंदुत्त्वाच्या नावाखाली मोठा हंगामा केला होता. परंतु आता एका चित्रपटात ज्या प्रकारे हिंदुत्वाची नौटंकी आणि तमाशा बनवला आहे, त्यावर हे लोक काहीच बोलत नाहीत, हे यांचं ढोंग आहे. यांच्या मते तेव्हा हिंदुत्व धोक्यात होतं मग आता यांचं हिंदुत्व धोक्यात नाही येत का?

संजय राऊत म्हणाले, या चित्रपटात ज्या प्रकारचे संवाद आहेत, जी दृष्यं आहेत त्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, लोकांमध्ये त्याबद्दल रोष आहे. त्यामुळे यावर कारवाईसाठी तुमच्याकडे कोणताही कायदा नाही का? हे लोक रामाच्या नावाखाली ढोंग दाखवत आहेत. यांचं रामायणच नकली आहे.

हे ही वाचा >> मनिषा कायंदेंच्या शिवसेना प्रवेशावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “४० कोटींची फाईल…”

या चित्रपटातील अनेक संवादांवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. त्यापैकी हनुमानाचं पात्र असलेल्या कलाकाराच्या तोंडी असलेल्या संवादांवरून मोठा गोंधळ सुरू आहे. यात हनुमानाचं पात्र रावणाच्या मुलाला म्हणतं, “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की”

Story img Loader