Sanjay Raut on Maharashtra State Co-operative Bank Scam : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागलं आहे. प्रामुख्याने अजित पवारांच्या पक्षाचं या निवडणुकीत मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर अजित पवार महायुतीत एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजपामधील काही नेत्यांनी अजित पवारांच्या महायुतीतील सहभागावर प्रश्न उपस्थित केले होते. पाठोपाठ आता शिखर बँक घोटाळा प्रकरणात ते अडचणीत आले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने या घोटाळा प्रकरणात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळावरील ८० जणांना क्लीन चिट दिली होती. मात्र अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लीन चिटला विरोध केला आहे. ईडीने विशेष न्यायालयात यासंदर्भात एक अर्ज दाखल केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा