राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा अद्याप सुरू आहे. त्यासोबतच प्रहार संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाचीही चर्चा चालू आहे. बच्चू कडू यांनी अनेकदा मंत्रीपदाची अपेक्षा आणि ते न मिळाल्याबद्दल जाहीर नाराजीही बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर कायमच चर्चेत राहणारे बच्चू कडू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पण यंदा मात्र न मिळालेल्या मंत्रीपदासाठी नसून त्यांनी राज्यात आमदारांचं मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होणार असल्याच्या केलेल्या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत. गुरुवारी त्यांनी केलेल्या या विधानावर आज माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

बच्चू कडू यांनी राज्यात येत्या १५ दिवसांमध्ये किमान २० ते २५ आमदारांचं पक्षांतर होणार असल्याचा दावा केला आहे. “सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
Devendra fadnavis mim
‘एमआयएम’वर उद्धव ठाकरेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांची अधिक प्रखर टीका
Sharad Pawar On Dhananjay Munde
Sharad Pawar : “राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्यांमध्ये तीन लोक प्रामुख्याने होते”, शरद पवारांचा रोख कुणाकडे? चर्चांना उधाण
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”

“मंत्रिमंडळा विस्तार कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत”, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.

राज्यात पुन्हा राजकीय वादळ उठणार? बच्चू कडू यांच्या दाव्यानंतर चर्चेला उधाण; म्हणाले, “येत्या १५ दिवसांत…”

संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया!

दरम्यान, बच्चू कडूंच्या या दाव्यावर खोचक प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी दुजोरा दिला आहे. “बच्चू कडू स्वत:ही प्रवेश करतायत का? कोण काय बोलतंय त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. बहुतेक मला माहितीये की भाजपाचे काही आमदार प्रवेश करतायत. बच्चू कडूंची माहिती बरोबर आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून खोचक टीका

एकीकडे बच्चू कडूंच्या विधानावर टीका करतानाच संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने राज्यातील भाजपा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. “पंतप्रधान वारंवार मुंबईत येतायत, कर्नाटकमध्ये जातायत. जिथे निवडणुका आहेत, तिथे पंतप्रधान वारंवार जातात. याचा अर्थ स्थानिक भाजपा नेते फार कमकुवत आणि दुर्बळ आहेत. पंतप्रधान स्वत: पालिका जिंकू इच्छितात”,असं संजय राऊत म्हणाले.