उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी सूचक शब्दामध्ये केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपाला इशारा दिलाय.
“आयकर विभाग, सीबीआय यांच्या माध्यमातून ही राजकीय छापेमारी ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही पण हा अजित पवार यांच्यावरील राजकीय राग असू शकतो,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरू आहे. सर्वच (विरोधी पक्षाच्या) राजकीय नेत्यांवर अशी कारवाई सुरू आहे,” असंही राऊत म्हणाले आहेत. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, “हेही दिवस निघून जातील. दिल्लीत आमचे ही दिवस येतील. अपना टाईम भी आयेगा,” असं म्हणत केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला सूचक इशारा दिलाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा