भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. “राऊतांच्या कुटुंबीयांची वाईन व्यवसायात भागीदारी” असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्याला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं असून किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा उलट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

“संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या वाईन उत्पादन ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

“मी वायनरीज सोमय्यांच्या नावावर करून द्यायला तयार!”

दरम्यान, या आरोपांवर प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला. “ते म्हणतायत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं, चोऱ्या-माऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं कधीही चांगलं. पण भाजपाचे थोतांडी लोकं जे काही म्हणत आहेत, अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे”, असं संजय राऊत म्हणाले. मला शरद पवारांनीही फोन केला होता, तेही हसत होते, असंही राऊत म्हणाले.

भाजपा नेत्यांची मुलं डान्सबार टाकणार आहेत का?

दरम्यान, यावेळी राऊत यांनी किरीट सोमय्यांसोबतच भाजपावर देखील तोंडसुख घेतलं. “अशोक गर्ग माझे मित्र आहेत. किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? भाजपा नेत्यांची मुलं केळी विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? कुणाची मुलं काय विकतात हा व्यक्तिगत प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची मुलं वांद्र्याच्या किंवा पेडर रोडच्या रस्त्यांवर स्टॉल टाकणार आहेत का? की डान्सबार टाकणार आहेत नाचवायला?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

“राऊतांच्या कुटुंबियांची वाईन उद्योगात पार्टनरशिप”, किरीट सोमय्यांनी सादर केली कागदपत्र!

“आमची मुलं तुमच्याप्रमाणे ड्रग्ज विकत नाहीत”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर गंभीर आरोप केले. “भाजपाच्या लोकांनी हे धंदे बंद करावेत. महाराष्ट्रात भाजपाच्या लोकांनी जे घाणेरडं राजकार सुरू केलं आहे, ते त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कार, परंपरा आहे. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. तुम्ही घरादारापर्यंत, आमच्या मुलाबाळांपर्यंत जाता. तुमची मुलं काय करतात ते बघा. आमची मुलं तुमच्याप्रमाणे ड्रग्ज विकत नाहीत किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले नाहीत”, असं राऊत म्हणाले.

“कुणाची भागीदारी असेल, तरी सरकारनं ठरवलेलं धोरण त्या विशिष्ट व्यक्तीसाठी आहे का? भाजपाच्या नेत्यांचे किती साखर कारखाने आणि वायनरीज आहेत ते पाहा”, असंही राऊत म्हणाले.