गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. “शिवाजी महाराज जुने आदर्श झाले, आता नितीन गडकरी-शरद पवार हे आदर्श आहेत”, असं वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यावरून आता विरोधकांनी भाजपावर आणि सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करायला सुरुवात केली आहे. राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवण्याची मागणी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. यानंतर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सीमाप्रश्नावरून केलेल्या विधानावर वाद सुरू झाला. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी आज भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

“हे फार मोठं कारस्थान”

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान आणि उकरून काढलेला वाद हे फार मोठं कारस्थान असल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला आहे, यामागे फार मोठं कारस्थान आहे. महाराष्ट्रात भाजपाच्या नेत्यांकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल कोश्यारी, सुधांशु त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर चिखलफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. त्याच्यावरून लक्ष विचलित व्हावं, म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातल्या काही गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न आहे.जेणेकरून लोकांनी दुसऱ्याविषयाकडे वळावं आणि शिवाजी महाराजांचा अपमान विसरावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण

विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं स्क्रीप्ट”

“असं नसतं, तर भाजपाचा एक मुख्यमंत्री भाजपाच्या दुसऱ्या राज्यावर असा हल्ला करताना देशात कुठे दिसत नाही. कधी पाहिलंय का तुम्ही की योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला? तो एक शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे कर्नाटकचे भाजपाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या भाजपाच्या उपमुख्यमंत्र्यांवर बोलणं ही ठरलेली स्क्रिप्ट आहे. शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो विषय चाललाय, त्यावरचा लोकांचा संताप कमी करावा आणि या विषयाकडे लक्ष वळवावं यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेलं हे स्क्रीप्ट आहे. सरकार सोडून द्या, महाराष्ट्राची एक इंच काय, एक वितही भूमी शिवसेना देणार नाही. महाभारत याच गोष्टीमुळे घडलंय. हे महाराष्ट्राचं नवं महाभारत घडू शकतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खोके सरकारवर महाराष्ट्राचा विश्वास नाही”, असं राऊत म्हणाले.

Video: “याला असंवेदनशीलता म्हणायचं की माज?” उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत भाजपाचं टीकास्र!

“सर्वात मोठ्या लढाईसाठी आम्ही तयार”

“जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात असे विषय निर्माण होतात, तेव्हा काहीतरी वेगळा विषय काढला जातो. राज्यपालांनी मुंबई-ठाण्यातल्या मराठी माणसाचा अपमान केला तेव्हाही गोंधळ झाला. तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतांना अटक झाली. आताही तसंच आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरेंनी काल रणशिंग फुंकलंय. आम्ही सगळ्यात मोठ्या लढाईसाठी तयार आहोत. ती लढाई कोणत्याही थराला जाईल”, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपाला आव्हान दिलं आहे.