Sanjay Raut on Maharashtra Government Swearing in Ceremony : संपूर्ण महाराष्ट्राला सध्या दोन प्रश्न पडले आहेत. महायुती राज्यात सत्तास्थापन कधी करणार? महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? त्यापैकी एका प्रश्नाचं उत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. राज्यात सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून येत्या ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेलं असं बावनकुळे यांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, बावनकुळे यांनी ही घोषणा केल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “ही घोषणा करायला बावनकुळे हे काय राज्याचे राज्यपाल आहेत का? त्यांना हे अधिकार कोणी दिले. राज्यापाल महोदयांनी बावनकुळे यांना घोषणा करायला सांगितली होती का?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संजय राऊत म्हणाले, “पाच तारखेला शपथविधी होईल हे सांगायला ते काय राज्यपाल आहेत का? मुळात त्यांना हे अधिकार आहेत का आणि हे अधिकार त्यांना कोणी दिले? राज्यपालांनी त्यांना सांगितलं आहे का? राज्यपालांनी बावनकुळेंना कळवलं आहे का? एकीकडे हे महायुतीवाले सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत आणि बावनकुळे पाच तारखेची घोषणा करून मोकळे झाले आहेत. मला एक कळत नाही की हे लोक घाबरतात का? राज्यात खूप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यघटनेचा मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. या सगळ्याला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड जबाबदार आहेत”.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…

५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी; बावनकुळे यांची घोषणा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झालं. २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. २८८ सदस्य असलेल्या विधानसभेत २३५ जागा महायुतीच्या वाट्याला आल्या. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. परंतु, निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. महायुतीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्रिपदाकरता जोरदार रस्सीखेच अद्यापही सुरू आहे. त्यामुळे राज्यात नवं सरकार कधी स्थापन होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. दरम्यान, आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून शपथविधीबाबत महत्त्वाची माहिती दिली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानात हा सोहळा रंगणार असून यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही येणार आहेत, असं बावनकुळे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.