Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील किल्ला पडल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीने रविवारी मुंबईत आंदोलनही केलं. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी महाविकास आघाडीचं आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित होतं अशी टीका केली आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलं नाही असाही दावा केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होते आहे. खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा आठ महिन्यांत कोसळला. ज्यानंतर महाविकास आघाडीने या घटनेचा निषेध करत जोडे मारो आंदोलन मुंबईत केलं. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, ““मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का?” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी टीका केली.

loksatta readers feedback
लोकमानस: विकासापेक्षा भावनांचे राजकारण सोपे
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Amit Shah Said This Thing About UCC
Amit Shah : UCC बाबत अमित शाह यांची मोठी घोषणा, आदिवासी बांधवांना काय दिलं आश्वासन?
terror of gangster Mangalwar Peth , Mangalwar Peth,
पुणे : तडीपार गुंडाची कोयते उगारून दहशत, मंगळवार पेठेतील घटना
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
loksatta readers response
लोकमानस : तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी वास्तव पाहावे
Thieves at ST station increase in incidents of theft from commuters during Diwali
एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट, दिवाळीत प्रवाशांकडील ऐवज चोरीच्या घटनांमध्ये वाढ

हे पण वाचा- ‘जोडे मारा’वरून जुंपली! पुतळा दुर्घटनाप्रकरणी मविआचे आंदोलन; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे विरोधकांवर टीकास्त्र

संजय राऊत काय म्हणाले?

“देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भाजपाचे लोक चिंतन बैठक करतात. त्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा संघर्ष यावर चिंतन बैठक बोलवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलं नाही असं फडणवीस म्हणत आहेत. पण सूरतचं व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होतं. स्वराज्याच्या विरोधात ते वागत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या व्यापाऱ्यांना लुटलं. कारण त्यांचे पैसे ईस्ट इंडिया कंपनीकडे जात आहेत. राष्ट्रीय हिताचा मुद्दा लक्षात घेऊन सूरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळाच आहे. इतिहासाची मोडतोड करायची हेच त्यांना माहीत आहे.” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

पंडीत नेहरुंनी चूक केली होती पण त्यांनी माफी मागितली

यानंतर संजय राऊत म्हणाले, “पंडीत नेहरुंनी त्यांचं पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवरायांबाबत काही टिपण्णी केली आहे. पंडीत नेहरु तेव्हा तुरुंगात होते. तुरुंगातून ते पुस्तक लिहिलं. त्यानंतर पंडीत नेहरुंनी माफीही मागितली. त्यांनी हे पण सांगितलं की माझ्याकडे संदर्भ नव्हते, कारण मी तुरुंगात होतो त्यामुळे मी माफी मागतो. आता तो इतिहास शोधला जातो आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की इतिहासात का जात आहात? शिवरायांच्या पुतळ्याबाबत बोला. तुमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. दीपक केसरकरांनी अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोललं पाहिजे” असं संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी म्हटलं आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj
छत्रपतींचं साम्राज्य ज्या पेशव्यांनी लयाला नेलं फडणवीस त्यांचे वारसदार आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

छत्रपतींचं राज्य लयाला नेणाऱ्या पेशवाईचे वारसदार म्हणजे देवेंद्र फडणवीस

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवत आंदोलन केलं. ते आंदोलन चिरडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलं. त्यामुळे आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य कोण आहेत ते सगळ्यांना कळलं आहे. तसंच शेवटच्या पेशव्यांनी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं आणि पुण्यातल्या शनिवार वाड्यावर सर्वात आधी ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केलीच नसती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यापासून रोखलं जातं आहे. पुतळा पडल्यानंतर तु्म्ही तो उभारणाऱ्यांना अटक करु शकत नाही कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत असा टोलाही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी लगावला.