Karnataka Vidhan Sabha Election Results 2023 : कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सत्तेच्या चाव्या आता काँग्रेसच्या हातात असतील. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकरावर टीका केली आहे. काँग्रेसचा हा विजय म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शाहांचा पराभव असल्याचं संजय राऊत म्हणाले. तसेच राऊत यांनी कर्नाटकमधील नागरिक आणि काँग्रेसचं अभिनंदन केलं. त्यामुळे भाजपाकडून राऊत यांच्यावर टीका सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया मागितली असता, फडणवीस म्हणाले दुसऱ्यांच्या घरात मुलं झाल्यामुळे संजय राऊत पेढे वाटतायत. फडणवीसांच्या या टीकेला आता राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत फडणवीसांना उद्देशून म्हणाले, आम्ही वाटतो पेढे, तुम्ही नका वाटू. दुसऱ्यांच्या घरात नाही महाराष्ट्र एक आहे. महाराष्ट्रात पेढे वाटू. फडणवीस आम्हाला बोलतायत मग तुम्ही कशाला गेला होता तिकडे कर्नाटकात.

खासदार संजय राऊत म्हणाले, तुम्ही (फडणवीस) आणि मुख्यमंत्री शिंदे कशाला गेला होता कर्नाटकात. सीमाभागात आमच्या मराठी माणसाचा पराभव करण्यासाठी गेला होता का? आम्ही भाजपाच्या पराभवाचे पेढे वाटतोय. आम्हाला आनंद झालाय कारण हुकूमशाहीचा सामान्य माणसाने पराभव केलाय म्हणून पेढे वाटतोय.

हे ही वाचा >> Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात भाजपाला मोठा धक्का, एक-दोन नव्हे तर तब्बल १३ मंत्री पराभूत

संजय राऊत म्हणाले, यापुढे तुम्हाला (भाजपा) दिल्लीची सत्ता मिळवता येणार नाही. २०२४ चा मार्ग, सत्तेचा दरवाजा हा कर्नाटकातून उघडला आहे. दिल्लीने (भाजपा) या पराभवातून बोध घ्यावा. भाजपाच्या पराभवामुळे सामान्य जनता आनंदोत्सव साजरा करतेय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams devendra fadnavis over karnataka election results 2023 asc