Bhaiyyaji Joshi on Marathi Language : “मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी केलं आहे. यावर आता विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. तर, सरकारमधील कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत म्हणाले, “भाजपावाल्यांचे वरिष्ठ नेते मुंबईत येतात आणि मुंबईची भाषा मराठी नाही असं सांगतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांचे दोन मिंधे आणि इतर मंत्रिमंडळाने हे वक्तव्य सहनच कसं केलं? मुंबईत कोणीही कुठलीही भाषा बोलू शकतो कारण या शहराची भाषाच नाही असं जोशी यांचं म्हणणं आहे. जोशी म्हणाले आहेत की घाटकोपरची भाषा गुजराती आहे. अमूक-तमूक भागाची अमुक-तमूक भाषा आहे, मराठी नाही. हेच वक्तव्य ते कोलकाता, लखनौ, चेन्नई, लुधियाना, बंगळुरू किंवा पाटण्यात जाऊन करू शकतात का?”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा