“ईडी, सीबीआय भाजपाचे वसुली एजंट म्हणून काम करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी वसुली एजंट म्हणून काम करत भाजपाला निवडणूक रोखे जमा करून देण्यात मदत केली. ज्या केंद्रीय तपास यंत्रणांनी, अधिकाऱ्यांनी भाजपासाठी काम केले, त्या सर्वांची चौकशी भाजपाचे सरकार गेल्यानंतर करण्यात येईल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे. या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो आणि पाठिंबा देतो”, असे विधान शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक रोखे या विषयावर त्यांनी भाजपावर टीकास्र सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळा पैसा भाजपाकडे गेला

संजय राऊत पुढे म्हणाले, “तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी, माजी खासदार आणि विद्यमान आमदार असलेल्या के. कविता यांना लोकसभेच्या तोंडावर अटक केली आहे. चौकशी पूर्ण होऊनही त्यांना अटक करणे, हे दबावतंत्र आहे. निवडणूक रोख्यांचा हजारो कोटींचा घोटाळा समोर आला आहे. धंद्याच्या बदल्यात चंदा या माध्यमातून हजारो कोटींचा काळा पैसा निवडणूक रोख्याच्या माध्यमातून दिला गेला. ज्या कंपनीचे उत्पन्नच १५० कोटी आहे, ती कंपनी ३०० कोटींचा निधी देते. याचा अर्थ या कंपन्यांना कुणीतरी काळा पैसा दिला, जो निवडणूक रोख्याच्या माध्यमातून देण्यात आला.”

‘भाजपाला ६ हजार कोटी, बाकीचे १४ हजार कोटी कुठे गेले?’, निवडणूक रोख्यांवर अमित शाह यांचा प्रश्न

भाजपावर मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल व्हावा

“सहा औषध कंपन्या आणि रुग्णालयांनी शेकडो कोटी भाजपाला दिले आहेत. गेमिंग कंपन्या, जुगार, ऑनलाईन लॉटरी सारख्या कंपन्यांनीही हजारो कोटी भाजपाला दिले. ज्यांच्यावर ईडी, प्राप्तीकर विभागाची कारवाई सुरू आहे, त्यांनीही भाजपाला पैसे दिले. या प्रकरणी मनी लाँडरिंगची केस भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर चालवली पाहीजे आणि त्यांना अटक केली पाहीजे. भाजपाकडून हजारो कोटींची लुटमार करून विरोधी पक्षाला नितीमत्ता शिकविण्याचा उद्योग केला जातो”, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

मोदी ‘चारसो पार’ की, सत्तेपार?

भाजपा ४०० पर नाही तर तडीपार होणार

“देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ज्या पद्धतीने निवडणूक रोख्यांचा घोटाळा समोर आला आहे, त्यातून “सिर्फ मै खाऊंगा…” हा मोदींचा नवा संदेश गावागावात गेला आहे. ‘ना खाऊंगा और न खाने दुँगा’, असं मोदी एकेकाळी म्हणाले होते. पण आता ‘मै और मेरे लोग खायेंगे’ हा नवा संदेश आता सामान्य माणसापर्यंत पोहोचला आहे. भाजपाचे सरकार हा देशाला लागलेला कलंक आहे आणि हा कलंक निवडणुकीतून धुवून काढावा लागेल. निवडणूक रोख्याच्या घोटाळ्यामुळे भाजपा ४०० पार नाहीतर तडीपार होणार”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

पंतप्रधान मोदी फादर ऑफ करप्शन

भाजपाला ४०० जागा हव्या आहेत, कारण त्यांना संविधान बदलायचे आहे. संविधान बदलल्यानंतर ते भ्रष्टाचारालाही शिष्टाचारात बदलतील. जसे निवडणूक रोख्याच्या योजनेला त्यांनी कायद्याचा आधार दिला होता. महात्मा गांधी फादर ऑफ नेशन होते, पंतप्रधान मोदी फादर ऑफ करप्शन आहेत, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut slams pm modi over bjp gets thousand crore electoral bonds kvg
Show comments