उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भोले बाबा नामक बाबाने भरविलेल्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेवरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. “या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. भोंदूगिरी तिथूनच सुरू होत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी एका पंतप्रधानाप्रमाणे वागले पाहीजे. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बुवा म्हणवून घ्याल. तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घ्याल. तुम्ही हिंदू आणि मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे. देशाच्या पंतप्रधानांनाच जर भोंदूगिरीतून राजकारण करायचे असेल, तर इतरांना काय सांगणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदार घेऊन आसामला जातात आणि कामाख्या देवी मंदिरात रेडे कापतात. त्यांच्यावर कोण कारवाई करणार? कायद्याने यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Hathras Stampede : मृतांच्या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक खुलासे समोर; डॉक्टर म्हणाले, “छातीत..”

loksatta readers response
लोकमानस: चाल, चरित्र बिघडल्याने भामटेगिरीला ऊत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
nirmalatai vitekar
पाथरी मतदारसंघात ‘विटेकर विरुद्ध वरपूडकर’ जुनाच सत्तासंघर्ष नव्या रूपात
Yogendra Yadav talk on Vanchits uproar says This is an attack on Babasahebs constitution
वंचितच्या गोंधळानंतर योगेंद्र यादव म्हणाले “हा तर बाबासाहेबांच्या संविधानावर हल्ला”
nda is narendra damodardas ka anushasan
“एनडीए म्हणजे नरेंद्र…”; शंकराचार्य शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक!
Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule and four other seats are included in first list of BJP from Nagpur
भाजपच्या पहिल्या यादीत, फडणवीस, बावनकुळे; सावरकरांना डच्चू, खोपडे, मेघे, मतेंना पुन्हा संधी
Sanjay Raut and Nana Patole
Mahavikas Aghadi : नाना पटोले अन् संजय राऊतांमधील वाद मिटला? बैठकीनंतर एकत्र येत भाजपावर केला गंभीर आरोप; म्हणाले, ‘मोठं षडयंत्र…’
MLA Mahale criticize Rahul Bondre that including Fadnavis name in voter list is publicity stunt not vote winning move
“…हा तर आघाडीचा रडीचा डाव अन् स्टंटबाजी,” भाजप आमदार श्वेता महालेंचे प्रत्युत्तर; म्हणाल्या….

संजय राऊत पुढे म्हणाले, हाथरसमध्ये सत्संग भरविणाऱ्या भोले बाबावर योगी सरकारने गुन्हा दाखल केलेला नाही. ८० हजार जणांची सत्संगाला परवानगी असताना त्याठिकाणी अडीच लाख लोक जमले होते. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे. मागच्या काळात खारघरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्य मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत २५ लोकांचा चेंगराचेंगरीत बळी गेला होता. खारघर आणि हाथरसमधील बळी हे अंधश्रद्धेचे बळी असून त्याला सरकार खतपाणी घालत आहे. या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते प्रतिष्ठा देत असतात. त्यामुळेच अशाप्रकारच्या दुर्घटना घडत असतात.

“भष्ट्राचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडूनच…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

लोक हतबल आहेत. गरीबी आणि महागाईमुळे ते पिचलेले आहेत. त्यामुळे ते भोंदूबाबाकडे जातात. नरेंद्र मोदी यांना मिळालेली मते ही भोंदूगिरीतून मिळालेली मते आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजपाच्या काळात अंधभक्त निर्माण झाले आहेत. पंतप्रधान स्वतःला देवाचा अवतार मानतात. त्यांचा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही, असे तेच सांगतात. जर पंतप्रधानच असे वागत असतील तर देशात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल.

लाडका शेतकरी योजना लागू करा

महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. आता सरकारने माझा लाडका शेतकरी योजनाही आणावी, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. महाराष्ट्रात रोज १० शेतकरी महाराष्ट्रात आत्महत्या करत आहेत. जानेवारी महिन्यात राज्यात ३५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होताना दिसत आहेत. यावर राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याने अद्याप भाष्य केलेले नाही. तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, पण त्या बहिणीचा लाडका भाऊ आत्महत्या करतोय. राज्यामध्ये यामुळे दुःखाचे सावट निर्माण झाले आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

राहुल गांधींच्या आरोपानंतर शहीद अग्निवीराला मिळालेल्या मोबदल्याची माहिती जाहीर; लष्कराने म्हटले…

अजित पवारांना खंत वाटली पाहीजे

अजित पवार यांनी आज सकाळी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मी पक्ष बदलला नसल्याची भावना व्यक्त केली. यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजित पवारांनी पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला. काकांचा मूळ पक्ष चोरला त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ पक्षांतर केले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता तर धनुष्य बाणासह बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना मिळाली नसती, तेव्हा जरा जपून बोला लोक ऐकत आहेत आणि लोकांना समजत आहे.