उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये भोले बाबा नामक बाबाने भरविलेल्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२१ लोकांचा बळी गेला. या दुर्घटनेवरून शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. “या देशाचा पंतप्रधानच सर्वात मोठा बुवा आहे. भोंदूगिरी तिथूनच सुरू होत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी एका पंतप्रधानाप्रमाणे वागले पाहीजे. तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बुवा म्हणवून घ्याल. तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणवून घ्याल. तुम्ही हिंदू आणि मुसलमान कराल, ही भोंदूगिरीच आहे. देशाच्या पंतप्रधानांनाच जर भोंदूगिरीतून राजकारण करायचे असेल, तर इतरांना काय सांगणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदार घेऊन आसामला जातात आणि कामाख्या देवी मंदिरात रेडे कापतात. त्यांच्यावर कोण कारवाई करणार? कायद्याने यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा