शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेवरून भाजपाकडून आक्रमक पवित्रा अवलंबण्यात येत आहे. संजय राऊत यांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यावर आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. “मी कुणालाही औरंगजेब म्हणालो नाही. मी औरंगजेबी विकृतीवर बोललो होतो. तसेच जे महाराष्ट्रावर चाल करून येतील, त्यांना गाडू. हे कुणाला व्यक्तिगत बोललेलो नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रावर चाल करण्याचा प्रयत्न केला, त्यांना याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलेले आहे, हा इतिहास आहे. इतिहासात अफजल खान, शाहिस्तेखान असेल किंवा औरंगजेब असेल. ज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले केले, त्यांना इथे गाडले गेले. यात काही चुकीचे नाही. त्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

“मी नकली असेल, तर तुम्ही बेअकली”; उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर; म्हणाले, “बाळासाहेबांचे नाव घेण्यापूर्वी…”

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
News About Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे काळ्या जादूचे बादशहा, त्यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा…”, शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची बोचरी टीका
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
uddhav thackeray loksatta news
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊत यांनी मांडली भूमिका
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

पंतप्रधानांचे विधान अत्यंत दळभद्री

बुधवारी तेलंगणातील एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘बाळासाहेबांचे नकली पूत्र’ असा केला होता. याचाही समाचार संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना जर नकली संतान कुणी बोलत असेल तर हा महाराष्ट्राचा अवमान आहे. संपूर्ण महाराष्ट्र मीनाताई ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानतो. या दोघांच्या बाबतीत अत्यंत दळभद्री विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.”

संजय राऊत पुढे म्हणाले, “हा प्रश्न फक्त उद्धव ठाकरे यांचा नाही आहे. हा प्रश्न बाळासाहेब ठाकरे यांना माननाऱ्या संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. तेलंगणात जाऊन उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणणे हा संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान आहे.”

गद्दारांना गद्दारच बोलणार

उबाठा गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून संबोधल्यानंतर शिंदे गटाकडून याची जोरदार प्रतिक्रिया देण्यात आली. याबद्दल संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनीही हाच आरोप केला. “एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० सहकाऱ्यांना पूर्ण देश गद्दार म्हणून ओळखतो. कोण काय बोलले, हे मला माहीत नाही. पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जे लोक एनडीएत गेले, लोक त्यांना गद्दार म्हणून हिणवत आहेत. ‘५० खोके, एकदम ओके’, हे कुणाला म्हटले जाते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

Story img Loader