Sanjay Raut on Raj Thackeray: काही लोकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची भाषा घाणेरडी केली, अशी टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर नाव न घेता केली. त्यांच्या टीकेला आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिलं आहे. विक्रोळी येथे राज ठाकरेंची शुक्रवारी सभा संपन्न झाली. या सभेत बोलत असताना त्यांनी एक संपादक या परिसरात राहत असल्याचे म्हटले. तो रोज सकाळी उठून माध्यमांसमोर बडबड करतो, त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची घाण करून टाकली, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. जे राज्याची लूट करत आहेत. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. ज्या शत्रूला जी भाषा समजते, त्याला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. शुद्ध तुपातली भाषा कुणासाठी वापराची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही चाटूगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काय बोलले, त्यात आम्हाला जायचं नाही. निवडणुका असल्यामुळे ते भाजपाचे स्क्रिप्ट वाचत आहेत. त्यांना स्क्रिप्ट वाचावी लागते. नाहीतर ईडीची वर तलवार आहेच.

Chandrashekhar Bawankule fb
Chandrashekhar Bawankule : अमित शाहांकडून फडणवीसांना मुख्यमंत्री बनवण्याचे संकेत? बावनकुळे म्हणाले, “मी वारंवार सांगतोय, महाराष्ट्रात…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sharad Pawar on Supriya Sule Sadanand Sule
“सुप्रिया सुळे सत्ताधाऱ्यांवर टीका करतात तेव्हा त्यांचे पती सदानंद सुळेंना…”, शरद पवार यांचे धक्कादायक विधान
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

मी बाळासाहेबांनी घडविलेला राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, “माझं बरचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आहे. हे राज ठाकरे यानांही माहीत आहे. त्यामुळे कोणत्या वेळेला कोणती भाषा वापरायची, याचे धडे मला राज ठाकरेंकडून घेण्याची आवश्यकता वाटत नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडविलेला राऊत आहे.”

“राज ठाकरे ज्या विभागात भाषण करून गेले. तिथे अंडरवर्ल्डचा वापर करून निवडणुका लढविल्या जात आहेत. भाजपा आणि शिंदेंकडून निवडणुकीत गुंडाचा वापर होत आहे. मुंबई-ठाण्यात अनेक गुन्हेगारांवर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. राज ठाकरेंनी त्यावर बोलावं”, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

विक्रोळी येथे भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राची भाषा घाणेरडी करून टाकणारा एक भिxx संपादक इथे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यांनाच दिलंय. आम्ही ठाकरे आहोत. त्यांना वाटतं शिव्या फक्त त्यांनाच येतात. सर्व राजकारण घाणेरडं करून टाकलंय. कोण काय बोललं, हा प्रश्न नाही. कोण किती खालच्या थराला जाऊन बोलतो, याच्याशी मला काही देणंघेणं नाही. पण माध्यमं जेव्हा हे दाखवतात, तेव्हा उद्या राजकारणात येणाऱ्या पिढीला वाटतं, हेच राजकारण आहे. असा जर समज व्हायला लागला तर महाराष्ट्राच्या राजकारणाची वाट लागेल. राजकारण गचाळ होईल, याची कल्पना तरी आहे का? कसलाही मागचा पुढचा विचार न करता सकाळी उठून बडबडत बसण्याचा उद्योग केला जातो.”

संयम बाळगतोय तर आम्हाला कमी समजू नये यांनीठ, असा इशारा राज ठाकरे यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता दिला.