राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याचं, पक्षात दोन गट पडल्याचं चित्र राज्याने पाहिलं आहे. परंतु, या पक्षाच्या नेत्यांची वेगवेगळी वक्तव्ये गोंधळात टाकणारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शरद पवार म्हणाले, “अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहेतच. त्यात कोणताही वाद नाही. राष्ट्रीय पातळीवर एक मोठा गट वेगळा झाला तर त्याला पक्षात फूट म्हणता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तशी परिस्थिती नाही. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. परंतु, लोकशाही प्रक्रियेत तो त्यांचा अधिकार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अशाच प्रकारचं वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही जणांनी वेगळा निर्णय घेतला आहे. परंतु, त्याला फूट म्हणता येणार नाही.” शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची ही वक्तव्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि राज्यातील जनतेला गोंधळात टाकणारी आहेत. अशातच शरद पवारांचा मित्रपक्ष आणि महाविकास आघाडीतील सहकारी पक्ष शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून यावर मोठी प्रतिक्रिया आली आहे. खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
devendra fadnavis chhagan bhujbal ajit pawar
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं नाव घेत म्हणाले, “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं नाही त्यामागे…”
Image of Uttam Jankar
Ajit Pawar : “…तर मी अजित दादांबरोबर जाईन”, शरद पवार यांच्या आमदाराचे मोठे विधान
Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Amol Mitkari : छगन भुजबळांनी घेतली फडणवीसांची भेट, राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “ही राजकीय भेट…”
Sanjay shirsat marathi news
मंत्री संजय शिरसाट यांचा रोख अब्दुल सत्तारांवर
society and housing society
‘हाउसिंग सोसायटी’पासून समाजापर्यंत… स्वातंत्र्य हवं, जबाबदारी नको?
Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”

खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पत्रकारांनी राऊत यांना विचारलं की शरद पवारांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे का? त्यावर संजय राऊत म्हणाले, यावर आता शरद पवार यांनी उत्तर द्यायचं आहे. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यायचं आहे. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीमध्ये अजित पवार नाहीत, केवळ शरद पवार आहेत.

हे ही वाचा >> वरिष्ठ वकिलाकडूनच वकील महिलेचा विनयभंग; म्हणाली, “ऑफिसमध्ये एकटक बघायचा, अन् मला…”

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजपाबरोबर गेलेल्यांना, हुकूमशाही प्रवृत्तीबरोबर हातमिळवणी करणाऱ्यांना, अशा कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला महाविकास आघाडीत स्थान नाही. ईडीला घाबरून ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात. मग ते आमच्याकडून गेलेले असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधून गेलेले असतील, तो निर्णय त्यांचा आहे. जसं शरद पवार म्हणाले, ही लोकशाही आहे, त्यामुळे तो निर्णय त्यांचा असेल. परंतु, आमचेही (महाविकास आघाडी) काही निर्णय आहेत. दोन दगडांवर किंवा तीन दगडांवर पाय असं कोणाचं राजकारण असेल तर त्यासंदर्भात जनता निर्णय घेईल.

Story img Loader