शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर आता राज्यात शिंदे गट आणि भाजपा यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, येत्या ११ जुलै रोजी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून त्यावर येणाऱ्या निकालांनंतर ही राजकीय समीकरणं अजूनच बदलण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज टीव्ही ९ शी बोलताना बंडखोर आमदारांच्या आमदारकीवरून खोचक टोला लगावला आहे. तसंच, त्यांना जाहीर आव्हान देखील दिलं आहे.

“शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही”

शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचं अस्तित्वच नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. “ते शिवसेनेत नाहीत. विधिमंडळात त्यांनी त्यांचा वेगळा गट स्थापन केलाय. पण शिवसेनेशिवाय त्यांचं अस्तित्व नाही. ते भाजपात मनानं, तनानं विलीन झाले आहेत. धनानं तर कधीच विलीन झाले आहेत”, असं राऊत म्हणाले.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: आर्थिक राजधानी मतदानासाठी सज्ज; ३० हजार पोलिसांचा बंदोबस्त!
PM Narendra Modi
Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात मतदानाला सुरुवात,…
Maharashtra vidhan sabha election 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज महामतपरीक्षा, ९.७० कोटी एकूण मतदार, एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे
voting percentage urban area
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महानगरांमध्ये मतटक्का वाढणार?
Maharashtra blood shortage loksatta
राज्यात ‘रक्तटंचाई’… चार दिवस पुरेल इतकाच साठा
Maharashtra swine flu death
स्वाइन फ्लूमुळे राज्यात ५७ मृत्यू
rice msp marathi news
भाताच्या हमीभावातील अत्यल्प वाढीने शेतकरी नाराज
Rohit Pawar
Rohit Pawar : “माझ्या कार्यकर्त्याला, नातेवाईकांना अन् मला काही झालं तर…”, भाजपाच्या आरोपानंतर रोहित पवारांचं प्रत्युत्तर
Ajit Pawar caste vote
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live : पहाटे मतदान केल्यानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्रिपदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य

“ते आमचे एकेकाळचे सहकारी होते. त्यांनी असे खेळ करू नयेत. तुम्हाला शिवसेनेत राहायचं नाही हे तुम्ही स्पष्ट केलंय. मग तुम्ही लोकांना भरकटवू नका”, असा सल्ला देखील राऊतांनी दिला आहे.

Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची भेट, राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

“आधी राजीनामा द्या, मग बोला”

“तुम्ही शिवसेना सोडली आहे. पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही तसं बोललात, तर लगेच तुमची आमदारकी रद्द होईल. कोर्टात जायचीही गरज नाही. किंवा त्यांनी शिवसेनेनं दिलेल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग त्यांनी काहीही बोलावं”, असं थेट आव्हान राऊतांनी यावेळी दिलं आहे. “४० आमदारांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि नंतर त्यांनी निवडणूक लढवावी. मग आम्ही त्यांची दखल घेऊ”, असं राऊत म्हणाले.

“उद्धव ठाकरे खोटं बोलतायत असं म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. अनेकदा शिवसेनेत अशी फूट झाली आहे. त्यानंतर आधीपेक्षा जोमानं आणि दुप्पट ताकदीनं शिवसेना उसळून उभी राहिली आहे. यावेळीही तसंच होणार”, असा विश्वास यावेळी संजय राऊतांनी बोलून दाखवला.