काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द केल्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीर आपोआप भारतात विलीन होईल असं वक्तव्य माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलं आहे. व्ही. के. सिंह यांच्या या वक्तव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, पाकव्याप्त काश्मीर भारतात येईलच, परंतु चीनने भारताचा हिसकावलेला भाग परत मिळवायला हवा. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि गलवान खोऱ्यात चिनी सैन्य घुसलंय त्याकडे लक्ष द्या.

खासदार संजय राऊत म्हणाले, लष्कराचे प्रमुखपद भूषवलेल्या एखाद्या व्यक्तीने इतकं बेजबाबदार वक्तव्य करू नये. आधी चीनने लडाखची जमीन गिळलीय ती ताब्यात घ्या. लडाख, अरुणाचल प्रदेश, गलवान खोरे येथील चीनने ताब्यात घेतलेला भाग परत घ्या. चीनचं सैन्य या प्रदेशात घुसलंय तो भाग ताब्यात घ्या. मग पुढचं आपण पाहू. पाकव्याप्त काश्मीर भारतात आला तर त्याचं स्वागतच आहे.

Sneha Dubey vasai assembly election 2024
Sneha Dubey : सहा टर्म आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूरांना कसं हरवलं? स्नेहा दुबे म्हणाल्या, “आरएसएसने…”
Atulbaba Bhosale
पृथ्वीराज चव्हाणांसारख्या मोठ्या नेत्याला पराभूत केल्याचं बक्षीस मिळणार?…
ajit pawar devendra fadnavis eknath shinde (1)
Maharashtra CM: अजित पवारांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं का ठरेल सोयीचं? एकनाथ शिंदेंसोबत कशी आहेत राजकीय समीकरणं?
Jitendra Avhad wins Maharashtra Assembly Election 2024, EVM results announced.
Jitendra Awhad: “मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो?” ईव्हीएमच्या गोंधळात जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
ajit pawar on evm marathi news
“लोकसभा, छत्तीसगड निवडणुकीत मतयंत्रात घोटाळा झाला नाही का?”, अजित पवार यांचा विरोधकांना सवाल
Devendra Fadnavis viral video
Devendra Fadnavis : ‘वापस आना पडता है’… देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ व्हायरल!
ajit pawar sharad pawar (6)
दोन्ही पवार पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर दिलीप वळसे पाटलांचं सूचक विधान; तर्क वितर्कांना उधाण!
ajit Pawar Sunil Tatkare shinde fadnavis
सत्तास्थापनेआधी महायुतीत राडा? आधी अजित पवार, आता तटकरेंच्या वक्तव्याने वातावरण तापलं; भाजपाही हतबल? नेमकं चाललंय काय?

संजय राऊत म्हणाले, आम्ही नेहमी स्वप्न पाहिलं आहे. अंखड भारत बनावा, अखंड हिंदुस्थान बनावा असं आमचं स्वप्न राहिलं आहे. पाकव्याप्त काश्मीर हा आमचा भाग आहे आणि आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत की तो आपल्या देशातच असावा. परंतु व्ही. के. सिंह ज्यावेळी त्या पदावर (लष्करप्रमुख) होते तेव्हा तो प्रदेश घेण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा होता. आता कसा घेणार?

हे ही वाचा >> “…म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला मनोज जरांगेंचं आंदोलन गुंडाळायचं आहे”, संजय राऊतांचा आरोप

संजय राऊत म्हणाले पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, त्यआधी मणिपूर शांत करा. मणिपूरपर्यंत चीन घुसलाय. राहुल गांधी म्हणत आहेत की लडाखमध्ये चीन घुसलाय, अरुणाचल प्रदेशमधील बराचसा भाग चीनने त्यांच्या नकाशावर दाखवला आहे, हे प्रकरण पहिलं संपवा. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीर घ्या. पाकव्याप्त काश्मीर भारतात येईल, त्यासाठी तुमची गरज नाही.