Sanjay Raut on MVA Seat Sharing: महाराष्ट्रात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका व देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात आता राजकीय समीकरणं क्लिष्ट होऊ लागली आहेत. मविआतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधले विद्यमान आमदार मोठ्या प्रमाणावर सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता मविआचं जागावाटप पक्षाकडे असणाऱ्या जागांवरून होणार की पक्षाकडे सध्या असणाऱ्या आमदारांवरून होणार? अशी चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या वर्षी शिवसेनेतील ४० विद्यमान आमदार शिंदेंच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत भाजपाबरोबर गेले. गेल्या महिन्यात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास तेवढेच आमदार सरकारमध्ये सामील झाले. त्यामुळे मविआमध्ये २०१९ साली पक्षानं जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाकडे राहणार, की विद्यमान आमदार त्या पक्षाकडे असणाऱ्या जागा त्या पक्षाला मिळणार? यावर खल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sanjay raut on dhananjay mahadik ladki bahin statement
“…म्हणून महिलांना धमक्या दिल्या जात आहेत”; धनंजय महाडिकांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
narendra modi criticized congress rahul gandhi
“संविधानाच्या नावाखाली लाल पुस्तकं छापून काँग्रेसने…”; नांदेडच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

दरम्यान, मविआमध्ये जागावाटपाचं नेमकं सूत्र काय ठरलंय? याविषयी तर्क-वितर्क लावले जात असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात सूचक विधान केलं आहे. त्यानुसार, आगामी काळात मविआचं जागावाटप होईल, असं त्यांचं म्हणणं आहे.

“जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे”

“महाराष्ट्रात मविआ मजबूत आहे. मविआ विधानसभा, लोकसभा एकत्र लढणार आहे. अनेकांना जागावाटपात तडजोडी कराव्या लागतील. ते करायला आमची तयारी आहे. आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या प्रमुख नेत्यांनी हे ठरवलं आहे की जागावाटपावरील मतभेद उघड करायचे नाहीत. जिंकेल त्याची जागा, जागेचा हट्ट धरायचा नाही हे सूत्र आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

सिनेट निवडणूक रद्द करण्यावरून टीका

दरम्यान, मुंबई विद्यापीठ प्रशासनानं सिनेट निवडणूक रद्द केल्यावरून संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली. “सिनेटची निवडणूक रद्द केली यात आश्चर्य वाटावं असं काहीही नाही. राज्यातलं सरकार भीतीपोटी कोणतीही निवडणूक घ्यायला तयार नाही. सिनेटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या युवासेनेचं पॅनल १०० टक्के जिंकणार होतं. या भीतीपोटी या निवडणुका रद्द केल्या. आपण किती निवडणुका रद्द करणार आहात? तुम्ही महापालिकेच्या निवडणुका त्याच भीतीपोटी घेत नाहीत. उद्या या भीतीपोटी तुम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका ठरलेल्या वेळी घेणार नाहीत का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.