ठाकरे गटाचं आज वरळी येथे राज्यव्यापी शिबीर पार पडलं. या शिबिरातून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोलेबाजी केली. देशात, राज्यात आणि मुंबईत सत्ताधारी पक्षाकडून कशी लूट केली जात आहे, याबाबत संजय राऊतांनी टीकास्र सोडलं. यावेळी त्यांनी चारोळीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाच्या शिबिरात भाषण देताना संजय राऊत म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण मुंबईचा ‘रोडमॅप’ आपल्यासमोर ठेवला आहे. मुंबईची कशी लुटालूट सुरू आहे, हे त्यांनी सांगितलं. होय, मुंबईची लूटच सुरू आहे. यासाठी दुसरा शब्द नाही. महाराष्ट्रात लूट… मुंबईत लूट… देशात लूट… या लुटीच्या कथा ऐकून मला दोन ओळी सुचल्या. ‘दो मस्ताने चले जिंदगी बनाने, चुना लगा के पुरा देश डुबाने'”

हेही वाचा- “…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

“हे दोन मस्ताने जसे दिल्लीत आहेत, तसे महाराष्ट्रातही आहेत. ते महाराष्ट्र आणि मुंबईला लुटतायत. गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रात एक बातमी छापून येत आहे. खरं तर, महाराष्ट्रातील नाशिक, कर्नाटकातील बंगळुरू आणि मध्यप्रदेशातील देवास येथे भारत सरकारचे नोटा छापण्याचे कारखाने आहेत. येथील कारखान्यातून तब्बल ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. ८८ हजार कोटी रुपयांच्या नोटांचे ट्रक गायब झाले आहेत. हे ट्रक कुठे गेले? महाराष्ट्रात जो खेळ झाला, यासाठी तर त्यांनी हे पैसे वापरले नाहीत ना? आजही तो खेळ सुरूच आहे. विविध पक्षातील नेत्यांना फोडलं जातंय,” अशा शब्दात संजय राऊतांनी टीकास्र सोडलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut speech do mastane chale jindagi banane narendra modi amit shah rmm
Show comments