ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी करत भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर आता उद्धव ठाकरे यांची २६ मार्च रोजी मालेगाव येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

मालेगाव येथे उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेच्या तयारीसाठी मी येथे आलोय. खरं तर, आमदारांना पाडण्याची गरज नाही. तो आधीच पडलेला आहे. उद्धव ठाकरे इकडे येतायत, ते आमदारांना पाडण्यासाठी नाही, तर कायमचं गाडण्यासाठी येत आहेत. मालेगावातून महाराष्ट्राला संदेश देण्यासाठी उद्धव ठाकरे येथे येत आहेत. मालेगावची निवड त्यासाठीच केली आहे. महाराष्ट्र अखंड आहे. जात-पात आणि धर्मभेद गाडून हा महाराष्ट्र उभा आहे. त्यासाठीच मालेगावची निवड केली आहे.”

ठाणे पोलिसांनी नोंदविला माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब; कथित गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन खंडणी वसूली प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Aba Bagul, Parvati Assembly Constituency,
‘बंडखोर’ आबांचे घरवापसीसाठी ‘आर्जव’
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

हेही वाचा- “ती ऑडिओ रेकॉर्डिंग मी स्वत: केली”, जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला जीवे मारण्याच्या कटाबद्दल मोठा खुलासा

संजय राऊत पुढे म्हणाले, “गेली चार-पाच दिवस माझी प्रकृती खरोखर बरी नाही. पण आज येथे यायचं ठरलं होतं. म्हणून मी टाळलं नाही. कारण मला आज मालेगावात यायचंच होतं. जेव्हा मी एखाद्याला गाडायचं ठरवतो, त्याला गाडतोच. आज त्याची सुरुवात झाली आहे. परवा मला दिल्लीत एका मुलाखतीत प्रश्न विचारला, हे गद्दार शिवसेना भवनावर चाल करून येणार आहेत. मी म्हटलं येऊ द्या… त्यांना २० फूट जमिनीच्या आतमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही. २० फूट जमिनीच्या खाली गाडू… ही धमकी आहे का? असं विचारल्यावर मी म्हटलं… होय, धमकी आहे असं समजा. ही नुसती धमकी नाही. तर ही धमकी कृतीमध्ये उतरवण्याची क्षमता आमच्यात आहे.”

हेही वाचा- “…तर थाळी वाजवून पुढचा कार्यक्रम करणार”, जुन्या पेन्शन योजनेवरून कर्मचारी संघटना आक्रमक

“अरे मिंधे-बिंधे शिवसेना असते का? शिवसेना एकच आहे बाळासाहेब ठाकरेंची… शिवसेना एकच उद्धव ठाकरेंची… तुम्ही कागदावर आमची शिवसेना काढून घेतली. मग आमच्यासमोर, व्यासपीठावर आणि बाहेर काय आहे? शिवसेना काय आहे, हे २६ तारखेला बघा. गेल्या ५५ वर्षांपासून ही शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केली आहे. त्यांनी तुमच्या आमच्यासाठी शिवसेना निर्माण केली. बाळासाहेब ठाकरेंना मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान व्हायचं नव्हतं. मराठी माणसाला या महाराष्ट्रात आणि मुंबईत सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावं, या एका जिद्दीपोटी शिवसेना निर्माण केली” असंही राऊत म्हणाले.

Story img Loader