ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली, असा आरोप राऊतांनी केला. राऊतांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही संजय राऊतांवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

हेही वाचा- “संजय राऊतांनी माझ्यासमोर दोघांना अश्लील…”, रामदास कदमांचा हल्लाबोल!

संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेवर केलेल्या आरोपांबाबत विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “खरं तर, या संजय राऊतांचं आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असं त्यांचं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगलं काम करणारं तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचं आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. पण बेभान झालेले संजय रऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही.”

हेही वाचा- “आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या…” नितेश राणेंनी अजित पवारांना लगावला टोला!

शहाजी बापू पाटलांच्या या टीकेनंतर संजय राऊतांनी पलटवार केला आहे. शहाजीबापू पाटलांच्या टीकेबाबत विचारलं असता राऊत म्हणाले, “हा कोण शहाजी? हा खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय.”

हेही वाचा- “संजय राऊतांनी माझ्यासमोर दोघांना अश्लील…”, रामदास कदमांचा हल्लाबोल!

संजय राऊत मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ नव्हते- शहाजीबापू पाटील

‘संजय राऊतांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती’ या रामदास कदमांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, “संजय राऊत हे मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे. तसेच रामदास कदम यांच्याकडे निश्चित पुरावे असल्याशिवाय असा आरोप ते करणार नाहीत. ते एक जबाबदार नेते आहेत.”