रश्मी ठाकरेंचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली जात आहे. शरद पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, आदित्य ठाकरे अशा अनेक नेत्यांनी भाजपावर टीका केली असताना संजय राऊत यांनी देखील त्यांच्या खास शैलीमध्ये भाजपावर निशाणा साधला आहे. “शिवसंवाद यात्रेला मिळत असलेल्या मोठ्या प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसंवाद यात्रेसाठी संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून तिथे बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “काल सकाळपासून शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाल्याबरोबर दुपारी ईडीनं कारवाई सुरू केली आणि लोकांचं लक्ष तिकडे वळवायला सुरुवात केली. मालमत्ता जप्त करण्याआधी त्यांना बोलवायला हवं होतं. या कारवाईचं भाजपाकडून समर्थन केलं जात आहे. ही हुकुमशाहीची नांदी आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Devendra Fadnavis,
“…तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल”; सज्जाद नोमानींच्या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

“आता हे तुटणं शक्य नाही”

“यांच्या कारवायांमुळे सरकार अस्थिर होत नाही. उलट ज्या काही फटी होत्या, त्या बुजल्या गेल्या. यामुळे तीन पक्ष इतके एकत्र आले, की आता हे तुटणं शक्य नाही”, असं ते म्हणाले.

“भाजपाचे सगळे रस्त्यावर भीक…”, संजय राऊतांनी साधला निशाणा, श्रीधर पाटणकरांवरच्या कारवाईनंतर दिली प्रतिक्रिया!

“सोमय्या काहीही बोलतात”

दरम्यान, यावेळी बोलताना संजय राऊतांनी भाजपा नेते किरीय सोमय्यांवर देखील खोचक टीका केली आहे. “सोमय्याांच्या बोलण्याला कोण विचारतंय? ते काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. हवाला किंगचे भाजपाच्या लोकांशी संबंध असल्याचे पुरावे मी पंतप्रधान कार्यालयाला दिले आहेत. पण त्यावर ईडी कारवाई करत नाहीये. किरीट सोमय्यांना आजपर्यंत अनेकदा भाजपाच्या अनेक नेत्यांच्या घोटाळ्यांची माहिती दिली आहे. पण त्यांच्या तोंडातून शब्द निघालेला नाही. त्यांनी ज्या नेत्यांच्याविरोधात ईडीच्या कारवाईची मागणी केली, ते सगळे लोक नंतर भाजपात गेले. त्यानंतर या महाशयांची वाचा गेली. मग यांच्यावर काय विश्वास ठेवताय? सोडून द्या”, असं राऊत यावेळी म्हणाले.

“पाहुणे आले घरापर्यंत”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत मनसेचा खोचक टोला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा!

“त्यांना राजकारणातून कायमचं हे राम…”

“एक दिवस यांना स्मशानात जावं लागेल. यांची हाडं राजकीय स्मशानात रचली गेली आहेत. जे करतायत, त्यांनी हे लक्षात ठेवावं की यांची लाकडं रचली गेली आहेत. त्यांना राजकारणातून कायमचं हे राम म्हणावं लागेल”, अशा शब्दांत राऊतांनी टीका केली आहे.