राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती. यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊतांनीही राणेंवर टीका करताना टोला लगावल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांनी फार समर्पक अशी उपमा दिलेली आहे. यांची(राणेंची) बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरली आहे. या जबाबदार सर्वस्वी नारायण राणे हा माणूस आहे आणि यापुढे जर तो बोलत राहिला, तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये तुझी पोरं येताय तर पोरांना येऊ दे, तू येतोस तर तू ये. ये मैदानात, केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय, हिंमत आहे तर एकटा फिर. स्वत:ला मोठा भाई समजतोस.”

अजित पवार काय म्हणाले होते? –

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाकडून अनेक ठिकाणी निर्देशने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना नितेश राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, ‘टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut targets narayan rane over ajit pawars criticism of nitesh rane msr