Lok Sabha Nivadnuk 2024 Schedule : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या लोकसभेच्या निवडणुका अखेर आज जाहीर झाल्या. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन १९ एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती दिली. महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका लागताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणूक जाहीर कराव्या लागल्या. त्यामुळे आम्ही सर्वच या निवडणुकांना सामोरे जाऊन महाराष्ट्रात आणि देशात परिवर्तनाचा जो चंग बांधला आहे, देशाचं स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्याचा आम्ही आमचा निर्धार पक्का आहे तो पूर्णत्वास नेऊ.
“निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी शंका व्यक्त केले जात आहे. निवडणूक आयोग सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करते अशी शंका लोकांच्या मनात आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकातून या निवडणूक आयोगाने या शंकांचं निरसन करावं. निष्पक्ष पद्धतीने, स्वत्रंत्रपणे या निवडणुकीचं नियोजन व्हावं. कायदा सुव्यवस्था, सत्ताधाऱ्यांची ढवळाढवळ आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण असणं गरजेचं आहे”, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
जग आपल्या लोकशाहीकडे विशिष्ट भूमिकेतून पाहतंय
“निवडणूक आयुक्त सेषन होते तेव्हा जनतेला विश्वास होता की या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोटाळा, चोऱ्या माऱ्या होणार नाहीत. पण आज लोक साशंक आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या असल्या तरी आपण स्वतंत्र आहोत, निष्पक्ष आहोत. जग आपल्या लोकशाहीकडे एका विशिष्ट भूमिकेतून पाहत आहे. त्यामुळे, या देशात लोकशाही राहणार की नाही हे या निवडणुका ठरवतील”, असंही राऊत म्हणाले.
मोदी आणि निवडणूक आयोग एकाच नाण्याच्या दोन बाजू
दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याआधी आयुक्त राजीव कुमार यांनी एक तास निवडणुकीच्या कार्यपद्धतीविषयी सखोल माहिती दिली. यावरून संजय राऊत म्हणाले, निवडणुकीत पारदर्शकता राहणार याची गॅरंटी मोदी देणार का? मोदी अनेक गॅरंटी देशाला देतात. पण निवडणुका पारदर्शकपद्धतीने होणार याची गॅरंटी देऊ शकतात का? मला वाटत नाही. कारण मोदी आणि निवडणूक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे त्यांचे निर्णय आणि त्यांच्या भूमिकावरून स्पष्ट होत आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा >> महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार निवडणूक; कोणत्या जिल्ह्यांत कधी होणार मतदान? जाणून घ्या
“मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही. तरीही आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मोदींनी गॅरंटी द्यावी. निवडणुका पारदर्शक करणार आहेत की निवडणूक आयोगाला तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुलं म्हणून वागवणार आहेत, असंही ते म्हणाले.
महाविकास आघाडीची यादी तयार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची यादी तयार आहे. जागा वाटप जवळजवळ संपलं आहे. शेवटची चर्चा आज-उद्या होईल. राहुल गांधींसह काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.