आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. फक्त तुष्टीकरण करणाऱ्या काँग्रेसला आम्ही बरोबर घेणार नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्याची आता संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी बरोबर कधीही जाणार नाही अशी आपली गर्जना होती, त्याचे काय झाले? सत्ता हा भाजपासाठी सट्टा झाला आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे संजय राऊत यांचं ट्वीट?

हा हा हा हा! बापरे!
राष्ट्रवादी सोबत कधी म्हणजे कधीच जाणार नाही अशी आपली गर्जना होती..त्याचे काय झाले? सत्ता हा भाजपा साठी” सट्टा” झालाय..कोणावरही आकडा लावला जातोय. महाराष्ट्र.. देश..लोकशाही सर्वकाही आपण सट्टा बाजारात गमावत आहोत..

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

आज ज्यावेळी सगळे लोक मोदींच्या विरोधात एकत्र येत आहेत तेव्हा हे म्हणून चालणार नाही की आम्ही कुणाला बरोबर घेणार नाही. जे येतील त्यांना बरोबर घेऊ पण एक गोष्ट नक्की आहे की काँग्रेसचा विचार चालणार नाही. काँग्रेसचा विचार तुष्टीकरणाचा विचार आहे. तुष्टीकरणाचा विचार करणारे पक्ष आम्ही बरोबर घेणार नाही. एमआयएम, मुस्लीम लिग यांनाही आम्ही बरोबर घेणार नाही. फाळणी कुणामुळे झाली? अशा प्रकारचा विचार करणाऱ्यांमुळे झाली. देशाचं विभाजन झालं तरी तुष्टीकरणाची नीती संपलेली नाही. त्यामुळे असं कुणालाही बरोबर घेणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं. जे कुणी येतील त्यांचं स्वागत करु पण पक्षाची जी तयारी आहे ती वाया जाऊ देणार नाही.

हे पण वाचा- “अजित पवार बिभीषण असतील आणि ते आमच्याबरोबर आले तर मग..”, देवेंद्र फडणवीसांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंविषयी काय म्हणाले फडणवीस?

लोक म्हणतात तुम्ही दोन पक्ष फोडले, कुणी म्हणतं तुम्ही घर फोडलं. मला विचारायचं आहे की जनादेशाची हत्या करण्याचं काम कुणी केलं. पक्ष फोडले म्हणणाऱ्यांना एकच सवाल आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे काय काल राजकाणात आले आहेत का? मी मोहिनी घातली आणि ते माझ्या मागे आले. असं घडलेलं नाही. ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या-त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. आणखी एक स्पष्टपणे सांगतो माझ्या मनात संभ्रम नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात जी युती झाली ती आमची भावनिक युती झाली. वादळं आली असतील, व्यक्ती व्यक्तींचं काही झालं असेल पण भावनिक युती आहे. राष्ट्रवादी युती आहे ती राजकीय मैत्री आहे. कदाचित ती पण भावनिक मैत्री येत्या काळात होईल. पण आज हे आमच्या मनात हे स्पष्ट आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut taunts devendra fadnavis about his comment on congress and ncp scj
Show comments