Sanjay Raut News: मागील दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच आज (३ ऑगस्ट) मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. “अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, यासंदर्भात सर्व पुरावे सीबीआयकडे असून आपण देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे”, असा आरोप सचिन वाझे यांनी केला. या प्रकरणावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सचिन वाझे हा भाजपाचा प्रवक्ता आहे. लवकरच त्याला भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ करतील आणि यामागचे सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत असा आरोप संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे.

सचिन वाझे कोण आहेत? कुठल्या आश्रमात तपश्चर्या करत आहेत?

सचिन वाझे कोण आहेत? कुठे आहेत वृद्धाश्रमात, साबरमती आश्रमात आहेत की वर्ध्याच्या आश्रमात तपश्चर्या करत आहेत? भाजपा निवडणुकीत उतरतो आहे. पराभवाच्या भीतीने विरोधकांवर हल्ले करण्यासाठी अशा संत महात्म्यांचा वापर भाजपा करणार असेल तर त्यांनी निवडणूक न लढताच पराभव मान्य केला आहे असं म्हणता येईल. अँटेलिया प्रकरणात बॉम्ब ठेवण्यात आला. निरपराध व्यक्तीचा खून करण्यात आला. महाराष्ट्र आणि देशाला हादरवणाऱ्या प्रकरणातला आरोपी पोलीस खात्यात आहे. मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांना भाजापाने क्लिन चीट दिली. उरलेले दोन आरोपी सुटले आणि मिंधे गटात आहेत. अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आणली. त्यानंतर त्यांनी फडणवीसांवर आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यायला हवं. उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, हे आम्ही पहिल्यांदाच पाहतो आहोत, असं Sanjay Raut म्हणाले.

Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
What Justice Chandiwal Said About Sachin Waze?
Justice Chandiwal : जस्टिस चांदिवाल यांचं वक्तव्य, “सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, त्यांनी मला समित देशमुखांचा मेसेज..”
Traders are aggressive due to Sanjay Raut statement Mumbai news
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे व्यापारी आक्रमक; माफी मागून विधान मागे घ्या, अन्यथा रोषाला सामोरे जा
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : “काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं बाळासाहेबांवर अधिक प्रेम आणि..”, संजय राऊत काय म्हणाले?
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sachin waze, Extortion case,
सचिन वाझेंनी आज अनिल देशमुख यांच्याविरोधात प्रतिक्रिया दिली आहे, ज्यानंतर हे सगळं देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन होतं आहे असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सचिन वाझे भाजपाचा प्रवक्ता-संजय राऊत (What Sanjay Raut Said About Sachin Waze?)

देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खून, दहशतवाद यात अडकलेला आरोपी भाजपाचा प्रवक्ता म्हणून काम करतो आहे. राजकारणासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी सरकारमधले लोक गुंड आणि टोळ्यांचा वापर करत आहेत, हे सिद्ध झालं. तुरुंगात यांचे फोन जात आहेत, प्रतिनिधी जात आहेत. कुणी काय बोलायचं ते सांगत आहेत. मला माध्यमांचं आश्चर्य वाटतं खुनातल्या, दहशतवादातल्या आरोपीला तुम्ही इतकं महत्त्व देत आहात. सचिन वाझेला भाजपाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली जाते. तो काहीतरी सांगतो, देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्याचं सांगतो याला काय म्हणायचं? सचिन वाझेची नार्को सोडा भाजपाच्या लोकांची नार्को करा म्हणजे समजेल त्यांनी काय काय करुन ठेवलं आहे. अनिल देशमुख, संजय राऊत ( Sanjay Raut ) , नवाब मलिक, संजय सिंग, अरविंद केजरीवाल या सगळ्यांना ईडी, पोलिसांचा गैरवापर करुन अडकवण्यात आलं. मुंबईचे त्यावेळेचे पोलीस आयुक्त आणि या खटल्यातले मुख्य आरोपी त्यांना मोकळं सोडण्यात आलं. कारण त्यांनी अनिल देशमुखांवर आरोप केले. तुरुंगातले दहा लोक आम्ही उभे करु शकतो जे देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, अमित शाह यांचं नाव घेतील. भाजपाने असे संत महात्मे गोळा केले आहेत. सचिन वाझेलाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून काही दिवसांनी स्वच्छ करतील. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले.

हे पण वाचा- Supriya Sule : “पत्राचं आणि आरोपांचं टायमिंग…”, सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचं गटार केलं आहे

देवेंद्र फडणवीसांनी राजकारणाचं गटार केलं. देवेंद्र फडणवीसांनी समोर येऊन सांगायला पाहिजे की गुंड आणि दहशतवाद्याच्या वक्तव्यावर विश्वास ठेवू नका. हे गृहमंत्री म्हणून त्यांचं काम आहे, हे गृहमंत्री काय करत आहेत? तर टाळ्या वाजवत आहेत, सचिन वाझेच्या वक्तव्यावर. देवेंद्र फडणवीस वकील आहेत. महाराष्ट्र अशा राजकारणाचा तिरस्कार करतो. देवेंद्र फडणवीस याचे सूत्रधार होते. कधीकाळी सचिन वाझे आमच्या जवळचे होते हे सोडून द्या. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी हे सगळे जवळचे होतेच. आज ते कुठे आहेत? वर्तमानात बोला असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सचिन वाझेने असं बोलण्याची तिसरी वेळ आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपा आणखी रसातळाला जाणार यात शंका नाही. असंही संजय राऊत ( Sanjay Raut ) म्हणाले आहेत.