शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे “शिवसेनेचा एक जरी आमदार फुटला कर त्याला रस्त्यात तुडवा” असं म्हणताना दिसत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे आता जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणाऱ्या राऊतांसह इतर सगळ्या नेत्यांना पायाखाली तुडवलं असतं, असं विधान गायकवाड यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांचा खोचक टोला!

“शिवसेनेचा एक जरी आमदार फुटला कर त्याला रस्त्यात तुडवा” या बाळासाहेब ठाकरेंच्या विधानाबाबत विचारलं असता संजय गायकवाड म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हयात असताना १९९०-९१ च्या आसपास शिवसेनेचे काही आमदार फुटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी ते आवाहन केलं होतं. आम्हीही शिवसैनिक म्हणून मोर्चे काढले होते. पण त्यावेळी जे आमदार फुटले होते, ते हिंदुत्वाशी गद्दारी करून फुटले होते. म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी ‘त्यांना तुडवा’ असं सांगितलं होतं. आम्ही हिंदुत्वाशी गद्दारी करून नव्हे तरबाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन बाहेर पडलो आहोत. आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणाऱ्या या राऊतासह सगळ्यांना पायाखाली तुडवलं असतं,” अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.

Story img Loader