मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेविरोधात छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेचं आयोजन केलं आहे. सरकारविरोधात घेतलेल्या या भूमिकेविरोधात त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर धरला होता. परंतु, आपण नोव्हेंबर महिन्यातच राजीनामा दिल्याचं छगन भुजबळांनी काल (३ जानेवारी) ओबीसी एल्गार सभेत जाहीर केलं. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“छगन भुजबळांनी राजीनामा दिला आहे, मंत्रिमंडळात काम करू इच्छिता, ओबीसींसाठी काम करू इच्छिता आणि तुमचा राजीनामा स्वीकारला जात नसेल तर ही मिलीभगत आहे. लोक म्हणत आहेत की छगन भुजबळांच्या तोंडून देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा स्वीकारला जाईल? कॅबिनेटमध्ये जेव्हा सरकार किंवा मुख्यमंत्र्यांविरोधात भूमिका घेतली जाते तेव्हा संबंधित मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसतो”, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> छगन भुजबळांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी त्यांचा…”

“छगन भुजबळ, जरांगे पाटील, धनगर समाजाच्या नेत्यांनी सरकारबरोबर बसून निर्णय घेतला पाहिजे. कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही मिळू नये. छगन भुजबळांनीही तीच भूमिका मांडली आहे. पण त्यासाठी महाराष्ट्रात इतक्या टोकाचा जातीयवाद निर्माण करण्याची गरज नाही. महाराष्ट्र जातीयवादाच्या खाईत ढकलला जातोय, हे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगलं नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.

“भुजबळ म्हणतात की राजीनामा दिला आहे, पण राजीनामा स्वीकारला नाही. त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आहे की देवेंद्र फडणवीसांना आहे? हे महाराष्ट्रातलं राजकारण लोकांना कळतंय”, अशीही टीका त्यांनी केली.

पद्म पुरस्कारांत संघातील अधिक लोक

लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल आम्हाला आनंद आहे. आडवाणी यांच्याबरोबरीने बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाही आम्ही भारतरत्न देण्याची मागणी केली होती. पण राजकीय सोय पाहण्याकरता सरकार अशा प्रकारची खिरापत वाटत आहे. यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमध्ये संघ परिवारातील सर्वाधिक लोक आहेत. लालकृष्ण आडवाणींचं देशातील राजकारणात मोठं योगदान आहे. राम मंदिरासाठी त्यांनी रथयात्रा काढली नसती तर आजचा भाजपा तुम्हाला दिसला नसता. दोन खासदारावरून भाजपा ३०० पार झाला तो आडवाणींमुळे. आडवाणींनी सातत्याने वाजपेयींची पाठराखण केली. अब की बार अटलबिहारी अशी घोषणा त्यांनी दिली. ते पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता असतानाही त्यांनी अशी घोषणा केली. पंतप्रधान होण्याची त्यांची क्षमता असतानाही त्यांना दूर सारलं गेलं. त्यांना इतकं गृहित टाकलं की आडवाणींना लोक विसरून गेले, अशीही टीका संजय राऊतांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rauts first reaction to chhagan bhujbals resignation said extreme casteism in maharashtra sgk
Show comments